एक्स्प्लोर

Maharashtra Television News :  'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ते 'तुझेच मी गीत गात आहे’ ; तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!

तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

Maharashtra Television News :  विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

Satvya Mulichi Satavi Mulgi : त्रिनयना देवीच्या प्रकटदिनी नेत्रावर कोणते संकट येणार? रूपाली आणि इंद्राणी मिळून डाव साधणार

Satvya Mulichi Satavi Mulgi Marathi Serial Update : 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satavi Mulgi) ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. आता त्रिनयना देवीच्या प्रकटदिनी नेत्रावर कोणते संकट येणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 

रुपालीला कळतं की इंद्राणीला नेत्राच्या मनातलं ऐकू येत नाही. त्यामुळे रूपालीचा संताप होतो आणि ती इंद्राणीला घर सोडून जायला सांगते. इंद्राणी घर सोडून जात असताना ममताचा आत्मा येऊन तिला रोखतो. ममता इंद्राणीला जाऊ नको, असं सांगते. इंद्राणीला याचं आश्चर्य वाटतं.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Mi Honar Superstar : 'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स'चा रंगणार 'महाराष्ट्र दिन' विशेष भाग; महाराष्ट्राच्या महान व्यक्तींना ज्युनियर्सची जल्लोषपूर्ण मानवंदना

Mi Honar Superstar : 'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स'चा (Mi Honar Superstar Jallosh Juniorscha) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कथाबाह्य कार्यक्रम आहे. अल्पावधीतच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आता या कार्यक्रमाचा 'महाराष्ट्र दिन' (Maharashtra Day 2023) विशेष भाग रंगणार आहे. 

'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स'चा या कार्यक्रमाच्या आगामी भागात महाराष्ट्राच्या महान व्यक्तींना ज्युनियर्स जल्लोषपूर्ण मानवंदना देणार आहेत. आपल्या नृत्याच्या माध्यमातून ते महाराष्ट्रातील महान व्यक्तींना मानवंदना देणार आहेत. 'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स' या कार्यक्रमाचा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Chala Hawa Yeu Dya: 'चला हवा येऊ द्या' मंचावर भरलीये कडक शिस्तीची 'जाम पंचायत'; प्रोमो पाहून खळखळून हसाल

Chala Hawa Yeu Dya 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya)  या शोमध्ये विविध सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. या शोमधील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. नुकतीच  महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) या चित्रपटाच्या टीमनं  'चला हवा येऊ द्या'  (Chala Hawa Yeu Dya)  या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी 'चला हवा येऊ द्या'  या कार्यक्रमातील कलाकारांनी एक खास स्किट सादर केलं. या स्किटचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Tuzech Mi Geet Gaat Aahe: मंजुळा आणि मल्हार येतील का समोरासमोर? 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा प्रोमो व्हायरल

Tuzech Mi Geet Gaat Aahe:  छोट्या पडद्यावरील तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  मालिकेत एक भावनिक वळण आलं आहे. मल्हार आणि मंजुळा लवकरच समोरासमोर येतील, असा अंदाज लावला जात आहे. सध्या  तुझेच मी गीत गात आहे मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये स्वराज, मल्हार आणि मंजुळा हे दिसत आहेत. 

'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मल्हार आणि मंजुळा हे दोघे एका झाडाला दोरा बांधत आहेत. यावेळी मल्हार म्हणतो, 'स्वराजचा आवाज परत यावा यासाठी हा नवसाचा दोरा बांधत आहे.' तर मंजुळा म्हणते,  'ते पोरगं सापडू दे रे देवा' तर एकीकडे स्वराज हा त्याचे आई-बाबा पुन्हा एकत्र यावेत यासाठी प्रार्थना करत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Aai Kuthe Kay Karte : अखेर ईशाच्या साखरपुड्याचा मुहूर्त ठरला; अरुंधतीने अनिरुद्धला मनवलंच

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे. ईशा आणि अनिशच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी केळकर कुटुंब देशमुखांच्या भेटीला आलेले पाहायला मिळाले. ईशा आणि अनिशच्या लग्नाला अनिरुद्ध विरोध करत आहे. पण मालिकेच्या आगामी भागात अनिरुद्ध  ईशा आणि अनिशच्या लग्नाला होकार देताना दिसणार आहे.

 सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Embed widget