Aai Kuthe Kay Karte : अखेर ईशाच्या साखरपुड्याचा मुहूर्त ठरला; अरुंधतीने अनिरुद्धला मनवलंच
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' या मालिकेत आता ईशाच्या साखरपुड्याचा मुहूर्त ठरलेला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे. ईशा आणि अनिशच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी केळकर कुटुंब देशमुखांच्या भेटीला आलेले पाहायला मिळाले. ईशा आणि अनिशच्या लग्नाला अनिरुद्ध विरोध करत आहे. पण मालिकेच्या आगामी भागात अनिरुद्ध ईशा आणि अनिशच्या लग्नाला होकार देताना दिसणार आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांना अनिश अरुंधतीचे आभार मानताना दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अरुंधती ईशा आणि अनिशच्या लग्नासाठी अनिरुद्धला मनवत असल्याचं दिसून आलं आहे. पण एक वडील म्हणून मुलीच्या काळजीपोटी अनिरुद्ध या लग्नासाठी तयार नव्हता.
मालिकेच्या आगामी भागात अनिरुद्ध अरुंधतीला सांगताना दिसेल की,"बाप म्हणून ईशाच्या लग्नासाठी मी तयार नाही. उद्या काही कमी जास्त झालं तर आयुष्य बिघडेल. पुढे जाऊन ईशाला तिच्या निर्णयाचा पश्चाताप झाला आणि तिने हे लग्न मोडलं तर... ईशा खूप हट्टी मुलगी आहे. तिच्याबाबतीत असं काही झालं तर ती सहन करू शकणार नाही". त्यावर आप्पा अनिरुद्धची समजूत घालत म्हणतात,"प्रत्येक मुलीच्या लग्नादरम्यान तिच्या वडिलांची हीच अवस्था असते".
View this post on Instagram
आप्पा पुढे म्हणतात,"अरुंधती आपल्या घरी आली तेव्हा ती लहानच होती. तीदेखील खूप काही करू शकली असती. पण आपण तिची प्रगती थांबवली. पण ईशाच्या बाबतीत अनिशचे आई-बाबा असं होऊ देणार नाहीत". अनिरुद्ध आणि आप्पांच्या संभाषणाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दुसरीकडे अरुंधती अनिशला म्हणत आहे,"आपलं संपूर्ण आयुष्य एका माणसाच्या आधारावर काढणं ही संकल्पना खूप छान आहे, सुंदर आहे. पण पुढे काय वाढून ठेवलेलं असतं हे आपल्याला माहिती नसतं बाळा... माझ्या मुलीची काळजी घेशील ना? अरुंधतीच्या या प्रश्नला उत्तर देत अनिश म्हणतो,"माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत".
'आई कुठे काय करते' या मालिकेत आपल्या मुलांच्या सुखासाठी धडपडणाऱ्या आईच्या भूमिकेत मधुराणी दिसत आहे. तर अनिरुद्ध ही भूमिका मिलिंद गवळीने साकारली आहे.
संबंधित बातम्या