एक्स्प्लोर

Kon Honar Crorepati : अक्षय कदमचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार का? जाणून घ्या वडाळ्याच्या अक्षयचा हॉटसीटपर्यंतचा प्रवास

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या आगामी भागात वडाळ्याचा अक्षय कदम दिसणार आहे.

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा कार्यक्रम अनेकांसाठी स्वप्नपूर्तीचा मंच ठरतो आहे. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातले स्पर्धक सहभागी होत असतात. कोणी डॉक्टर, कोणी पोलीस उपनिरीक्षक तर कोणी वकील अशा वैविध्यपूर्ण स्पर्धकांमुळे 'कोण होणार करोडपती'चा खेळ अधिक रंगतदार होतो. 'कोण होणार करोडपती'च्या आगामी भागात वडाळ्याचा एक स्पर्धक सहभागी होणार आहे. 

वडाळा येथे राहणारे, लेखक असणारे अक्षय कदम सहभागी होणार आहेत. मध्यमवर्गीय घरातले अक्षय कदम घरच्यांच्या सुखासाठी आणि व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने या खेळात सहभागी झाले आहेत. आईवडीलांनी केलेल्या कष्टांची जाणीव असणारे संवेदनशील स्पर्धक अक्षय कदम हे सध्या कंटेट रायटर  म्हणून काम करत आहे. त्यांच्या घरी तो, त्याचे आई-वडील आणि एक बहीण असा परिवार आहे. अक्षयची आई दुसऱ्यांच्या घरी घरकाम करते, वडील प्रिंटिंग प्रेस मध्ये कामाला होते पण करोनापासून त्यांचं काम बंद आहे. अक्षय यांची बहीण नायर हॉस्पिटलमध्ये डायलिसिस टेक्निशियन (dialysis technician) म्हणून काम करते. शिक्षण घेता घेता अक्षयने आईस्क्रिम च्या दुकानात काम करत कष्ट करून पैसे मिळवण्यास सुरुवात केली. 

अक्षयचा प्रेरणादायी प्रवास!

अक्षय कामाला लागल्यापासून त्याने आईला काम सोडून द्यायला संगितले होते पण आईची सवय आहे काम करण्याची म्हणून तिने अजून काम सोडलेले नाही. आईने खूप कष्ट केले आहेत आणि याची जाणीव असल्याने अक्षयला आता तिला आराम द्यायचा आहे. अक्षयचं हे स्वप्न आहे की त्याला त्याची स्वतःची टूर कंपनी सुरू करायची आहे. ज्यात तो लोकांना चांगल्या ठिकाणी कमीत कमी खर्चामध्ये घेऊन जाईल. त्याचबरोबर त्याचं अजून एक स्वप्न आहे की, त्याला आईस्क्रीमचं दुकान सुरू करायचं आहे. आईस्क्रीमच्या दुकानात अक्षयने काम केल्यामुळे तिकडचा अनुभव त्याच्याजवळ आहे. मध्यमवर्गीय अक्षय 25 लाख रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचला असून  अक्षयचे करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार का हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.   

कुठे पाहता येणार? सोनी मराठी (सोम-शनि रात्री 9 वाजता), सोनी लिव्ह ॲप

संबंधित बातम्या

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर भारती दबडेने केली आयुष्यातली पहिली कमाई; रंगला ज्ञान आणि मनोरंजनाचा अद्भुत खेळ!

Kon Honar Crorepati : मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी ललिता खेळणार 'कोण होणार करोडपती'; मांडणार शेतकर्‍यांच्या कुटुंबाची व्यथा

Kon Honar Crorepati : ज्येष्ठ लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती येणार 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tuljapur News : तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
Uddhav Thackeray: उद्धव साहेबांविषयीचा माझ्या मनातील रिस्पेक्ट कायम राहील, पण... तेजस्वी घोसाळकरांनंतर आणखी एका शिवसैनिकाने ठाकरेंची साथ सोडली
उद्धव साहेबांविषयीचा माझ्या मनातील रिस्पेक्ट कायम राहील, पण... तेजस्वी घोसाळकरांनंतर आणखी एका शिवसैनिकाने ठाकरेंची साथ सोडली

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tuljapur News : तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
तुळजापुरात भाजप आणि माविआच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, तुफान हाणामारी करत हवेत गोळीबार; काँग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीररित्या जखमी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
माजी मंत्र्यांचा पुतण्या बांधणार भाजपमधील नाराज बंडखोरांची मोट, अकोल्यात स्थापन होणार नवी आघाडी
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
Uddhav Thackeray: उद्धव साहेबांविषयीचा माझ्या मनातील रिस्पेक्ट कायम राहील, पण... तेजस्वी घोसाळकरांनंतर आणखी एका शिवसैनिकाने ठाकरेंची साथ सोडली
उद्धव साहेबांविषयीचा माझ्या मनातील रिस्पेक्ट कायम राहील, पण... तेजस्वी घोसाळकरांनंतर आणखी एका शिवसैनिकाने ठाकरेंची साथ सोडली
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
Embed widget