Kitchen Kallakar : 'किचन कल्लाकार'मध्ये खडसे-सोमय्यांचा कल्ला; राऊतांचा फोटो दाखवल्यावर सोमय्यांसमोर खडसे म्हणाले...
Kitchen Kallakar : आता किचन कल्लाकार (Kitchen Kallakar) या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडमध्ये एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे देखील हजेरी लावणार आहेत.

Kitchen Kallakar : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम किचन कल्लाकार (Kitchen Kallakar) सध्या चर्चेत आहे. या कार्यक्रमामध्ये अभिनय क्षेत्रातील कलाकारांसोबतच राजकीय क्षेत्रातील काही नेते मंडळीदेखील हजेरी लवतात. किशोरी पेडणेकर (kishoritai pednekar),चित्रा वाघ (chitratai wagh) आणि रुपाली ठोंबरे (rupalitai thombre) यांनी काही दिवसांपूर्वी या शोमध्ये हजेरी लवली. आता या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडमध्ये राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे देखील हजेरी लावणार आहेत. या एपिसोडचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओ दिसत आहे की, सोमय्या आणि खडसे हे एकमेकांसाठी 'ये दो दोस्ती हम नही तोडेंगे' हे गाणं गाताना दिसत आहेत.
किचन कल्लाकारच्या या आगामी एपिसोडच्या व्हिडीओमध्ये दिसतं की, खडसे यांना संजय राऊत यांचा फोटो दाखवण्यात येतो. कार्यक्रमाचा सूत्रसंचालक संकर्षण कराडे हा खडसेंना प्रश्न विचारतो, 'हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला कोणतं गाणं आठवतं' तो फोटो पाहिल्यानंतर खडसे, 'आ देखे जरा किसमें कितना है दम.' हे गाणं गातात. त्यानंतर संकर्षण म्हणतो, 'नो कमेंट्स या झोनमध्ये किरीट सर आता आहेत. ' व्हिडीओ पाहिल्यानंतर किचन कल्लाकारचा हा एपिसोड पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
View this post on Instagram
किचन कल्लाकार या कार्यक्रमामध्ये येऊन हे कालकार आणि नेते मंडळी वेगवेगळे पदार्थ तयार करतात. या कार्यक्रमाचे परिक्षण हे अभिनेते प्रशांत दामले हे करतात.
हेही वाचा :
- Yashoda : समंथा रुथ प्रभूच्या 'यशोदा'ची रिलीज डेट जाहीर, सिनेमात अॅक्शनचा तडका
- Ranbir Alia Wedding Guest List : रणबीर- आलियाच्या लग्नाला 'हे' सेलिब्रिटी लावणार हजेरी; पाहा वेडिंग गेस्ट लिस्ट
- Happy Birthday Ayesha Takia : सलमानच्या ‘वॉन्टेड’मधून मिळवली तुफान लोकप्रियता, आता लग्न करून संसारात रमलीये आयेशा टाकिया!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
