Khupte Tithe Gupte: 'एका रिक्षावाल्यानं मला शिवी दिली...'; 'खुप्ते तिथे गुप्ते' मध्ये अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी सांगितला किस्सा
अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) या ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमामध्ये हजेरी लावणार आहेत. नुकताच

Khupte Tithe Gupte: अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte) ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमामध्ये अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) या हजेरी लावणार आहेत. हा एपिसोड प्रेक्षकांना 13 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना बघता येणार आहे. नुकताच खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये वंदना गुप्ते या एक किस्सा सांगताना दिसत आहेत.
खुपते तिथे गुप्ते (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसते की, वंदना गुप्ते म्हणतात, "मी एका रिक्षावाल्याला ओव्हरटेक केलं. त्यामुळे त्या रिक्षावाल्यानं मला शिवी दिली. मग मी माझ्या गाडीमधून खाली उतरले. मी त्या रिक्षावाल्याला विचारलं, 'काय बोलला तू?' तो म्हणाला, 'काही नाही' मग मी त्याला म्हणाले, 'तू मला शिवी दिली' मी त्याच्या मानेला धरलं आणि त्याला खाली वाकवलं. त्यानंतर तो ओरडायला लागला. मी हात झटकले आणि गाडीत बसले, तोपर्यंत सिग्नल सुटला होता."
"ऐकूया, अभिनेत्री वंदना गुप्तेंकडून त्यांच्या बिनधास्त स्वभावाचे, भन्नाट किस्से..!" असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.
View this post on Instagram
वंदना गुप्ते या अनेक आठवणी तसेच किस्से खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये सांगणार आहेत. प्रेक्षक खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडची उत्सुकतेने वाट बघत आहेत. वंदना गुप्ते यांच्या 'बाई पण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. त्यांनी अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मातीच्या चुली, पछाडलेला, लपंडाव या चित्रपटांमध्ये वंदना गुप्ते यांनी काम केलं. आंबट गोड, ह्या गोजिरवाण्या घरात, सुखाच्या सरींनी हे मन बावरे या मालिकांमध्ये देखील त्यांनी काम केलं. त्यांचा 'बाई पण भारी देवा' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये सई ताम्हणकर, श्रेयस तळपदे या कलाकारांनी हजेरी लावली होती. तसेच या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे, संजय राऊत,नारायण राणे यांनी देखील हजेरी लावली होती.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :


















