Khupte Tithe Gupte : 'तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंचा फोन आला होता'; ‘खुपते तिथे गुप्ते’ मध्ये नारायण राणेंनी सांगितला किस्सा
नुकताच खुप्ते तिथे गुप्ते (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये नारायण राणे हे एक आठवण सांगताना दिसत आहेत.
Khupte Tithe Gupte : अवधूत गुप्तेचा (Avadhoot Gupte) ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) हा कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात नारायण राणे (Narayan Rane) हे हजेरी लावणार आहेत. नुकताच खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये नारायण राणे हे एक आठवण सांगताना दिसत आहेत.
'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, नारायण राणे म्हणतात, 'माझ्यासोबत माझा रवी नावाचा एक मित्र होता. तो मला सकाळी चार वाजता उठवत होता. तो मला म्हणाला की, तुझं घर जाळलंय आणि ते टीव्हीवर दिसतंय. तेव्हा मला बाळासाहेबांचा फोन आला होता. ते म्हणाला, मी पाहतोय तुझं घरं जळतंय, पण लक्षात ठेव “सोनं जेव्हा जळतं, तेव्हा जास्त उजळतं”.'
नारायण राणे हे खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमामध्ये कोण कोणत्या आठवणी, किस्से सांगणार आहेत? याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 18 जून (रविवार) रोजी प्रेक्षक हा एपिसोड रात्री , 9 वाजता पाहू शकतात.
पाहा प्रोमो:
View this post on Instagram
'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाच्या एका सेगमेंटमध्ये नारायण राणे हे उद्धव ठाकरेंना फोन देखील करणार आहेत. 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाच्या एका प्रोमोमध्ये दिसले की, नारायण राणे म्हणतात, 'जय महाराष्ट्र उद्धवजी नारायण राणे बोलतोय'
View this post on Instagram
'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात कला, राजकारण अशा विविध क्षेत्रातील लोक हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हजेली लावली होती. तसेच या कार्यक्रमात अभिनेता श्रेयस तळपदेनं देखील हजेरी लावली होती. 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील लवकरच हजेरी लावणार आहेत, असंही म्हटलं जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :