एक्स्प्लोर

Nilesh Sable Social Media Post: 'नवा विचार… चला… काहीतरी नवीन करूया…'; निलेश साबळेच्या पोस्टची जोरदार चर्चा, डॉक्टरांची नवी सुरुवात?

Nilesh Sable Social Media Post: निलेश साबळेच्या सोशल मीडिया पोस्टची जोरदार चर्चा रंगलीय. त्याच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं आहे. 

Nilesh Sable Social Media Post: महाराष्ट्रातल्या (Maharashtra) प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कार्यक्रम म्हणजे, 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya). तब्बल 10 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर 2024 मध्ये या कार्यक्रमानं निरोप घेतला. त्यानंतर या मराठमोळ्या कार्यक्रमाचं (Marathi Show) नवं पर्व, 26 जुलैपासून झी मराठीवर (Zee Marathi) सुरू झालं पण, नव्या बदलांसह... 'चला हवा येऊ द्या'ची संपूर्ण टीम या नव्या पर्वात दिसली नाही. महत्त्वाची बाब म्हणजे, निलेश साबळे आणि भाऊ कदम ही प्रेक्षकांची दोन लाडकी व्यक्तीमत्त्व नव्या पर्वात नाहीत. नव्या पर्वाची घोषणा होताच, हे दोघे का नाहीत? यावरुन बराच गदारोळ झालेला. त्यावेळी आम्ही वेगळ्या कामांमध्ये बिझी आहोत, असं उत्तर दोघांकडूनही देण्यात आसेलं. त्यावेळी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले. त्यानंतर मधल्या काळात निलेश साबळेनं भाऊ कदमसोबत एक शो सुरु केलेला, मात्र तो शोही बंद पडला. अशातच आता निलेश साबळेनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर केलेल्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं आहे. 

'चला हवा येऊ द्या'च्या यंदाच्या पर्वात शोचा कर्ताधर्ता आणि पहिल्यापासून या कार्यक्रमाची घडी ज्यानं बसवली, तो डॉ. निलेश साबळे (Dr. Nilesh Sabale) नव्या पर्वात दिसणार नसल्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झालेला, पण आता निलेशनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर केलेल्या पोस्टची चर्चा रंगली आहे. या पोस्टमुळे चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. तसेच, उत्सुकताही वाढली आहे.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nilesh Sabale (@dr.nilesh_sabale_official)

डॉ. निलेश साबळेनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो सूट घालून खुर्चीवर बसला आहे. डोळ्यावर चष्मा आहे. काहीसा गंभीर आणि जबाबदार वाटणारा निलेश साबळेचा लूक आहे. हा फोटो शेअर करत निलेश साबळेनं कॅप्शन लिहिलंय की, "नवा दिवस… नवा विचार… चला… काहीतरी नवीन करूया…!!!" 

दरम्यान, निलेश साबळे आता नवं काय करणार, याची उत्सुकचा सर्वांना लागली आहे. त्याच्या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अनेकजण नव्या कार्यक्रमासाठी त्याला शुभेच्छा देत आहेत. तर, अनेकजण नव्या कार्यक्रमात नव्या कलाकारांना संधी देण्याचं निलेश साबळेला सुचवत आहेत. अशातच आता निलेश साबळेची ही पोस्ट नेमकी काय? खरंच निलेश साबळे नवा कार्यक्रम घेऊन येणार आहे का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Chinmay Mandlekar Recive Fraud Call: 'पैसे भरा नाहीतर...', प्रसिद्ध मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकरला फ्रॉड कॉल; माणसं घरी पाठवू असं म्हणत थेट धमकी

महत्त्वाच्या बातम्या

Box Office: 4 वर्षांत एकही चित्रपट नाही, तरी निर्मात्यांनी लावले तब्बल 4500 कोटी; यश बॉक्स ऑफिसवर पुन्हा इतिहास रचणार?
4 वर्षांत एकही चित्रपट नाही, तरी निर्मात्यांनी लावले तब्बल 4500 कोटी; यश बॉक्स ऑफिसवर पुन्हा इतिहास रचणार?
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Embed widget