Khupte Tithe Gupte : आता खुपणार नाही तर टोचणार! पुन्हा सुरू होतंय 'खुपते तिथे गुप्ते'
Khupte Tithe Gupte : 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Khupte Tithe Gupte Show : छोट्या पडद्यावरील काही कार्यक्रमांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील या कार्यक्रमांनी बाजी मारली आहे. असाच एक कार्यक्रम म्हणजे 'खुपते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte). आता या कार्यक्रमाचं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
झी मराठीने 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) त्याच्या स्टाईलमध्ये म्हणत आहे की, प्रश्नांची धार वाढणार...आता खुपणार नाही तर टोचणार...'खुपते तिथे गुप्ते' लवकरच". अवधूतनेदेखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिलं आहे,"खुप्ते तिथे गुप्ते लवकरच...पुन्हा घेऊन येतोय तुमच्या भेटीला".
10 वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला 'खुपते तिथे गुप्ते'!
'खुपते तिथे गुप्ते' प्रेक्षकांचा आवडता, जबरदस्त आणि अफलातून कार्यक्रम 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा कार्यक्रम पुन्हा सुरू होत असल्याने पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेकांनी गुपिते उलगडली जाणार आहेत.
View this post on Instagram
'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाच्या माध्यमातून अवधूत गुप्ते खुपणारी गोष्ट बेमालूमपणे व खुबीने समोर आणणार आहे. 'खुपते तिथे गुप्ते'चं हे पर्व वेगळं असणार आहे. या पर्वाचं खास आकर्षण एक खास खुर्ची असणार आहे. या खुर्चीसाठी सगळीकडे चढाओढ पाहायला मिळणार आहे. नोकरदार, कॉर्पोरेट आणि राजकारणी मंडळींमध्ये खुर्चीसाठीची ही चढाओढ पाहायला मिळणार आहे.
'खुपते तिथे गुप्ते'च्या खास खुर्चीवर सेलिब्रिटी, राजकारणी मंडळींसह अनेक मान्यवर बसणार आहेत. गुप्तेंचे प्रश्न या मंडळींना फक्त खुपणार नाहीत. तर टोचणार आहेत. या कार्यक्रमाची घोषणा झाल्यामुळे चाहते आता या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'खुपते तिथे गुप्ते' हा कार्यक्रम पुन्हा सुरू होत असल्याने चॅनलच्या टीआरपीमध्ये वाढ होणार आहे. तर दुसरीकडे कानाला खडा हा कार्यक्रमदेखील पुन्हा सुरू करा, अशी मागणी चाहते करत आहेत. दुसरीकडे अभिनेता श्रेयस तळपदेपासून 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाची सुरुवात करा, अशी मागणी चाहते करत आहेत.
संबंधित बातम्या