Khupte Tithe Gupte : “तुम्ही मनसेमध्ये सामील होत का नाही?” अवधूत गुप्तेचा प्रश्न, अभिजीत बिचुकले म्हणाले...
'खुपते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte) प्रश्नाला अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) उत्तर देताना दिसत आहेत.
Khupte Tithe Gupte : ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte) कार्यक्रमामध्ये अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) हे हजेरी लावणार आहेत. नुकताच 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये अवधूत गुप्तेच्या प्रश्नाला अभिजीत बिचुकले उत्तर देताना दिसत आहेत.
'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, अवधूत गुप्ते हा राज ठाकरे यांचे नाव असणारी चिठ्ठी अभिजीत बिचुकले यांना दाखवतो. त्यानंतर अवधूत गुप्ते हा प्रश्न विचारतो, 'यांच्याबद्दल खुपणारी एक गोष्ट कोणती?' यावर अभिजीत बिचुकले म्हणाले, “आमच्या दोघांची देखील परिस्थिती एकसारखी आहे. त्यांच्याकडे एकेकाळी 13 आमदार आले होते आणि माझं अजून खात उघडायचं आहे.”
त्यानंतर 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसते की, अवधूत गुप्ते म्हणतो, “तुम्ही मनसेमध्ये सामील होत का नाही?” अवधूत गुप्तेच्या या प्रश्नाचं अभिजीत बिचुकले यांनी उत्तर दिलं,'बोलावणं आल्याशिवाय नाही.' त्यानंतर अवधूत गुप्ते म्हणतो, 'राज साहेब तुम्ही जर यांना बोलवून घेतलं...' तेवढ्यात अभिजीत बिचुकले हे अवधूत गुप्तेचं बोलणं थांबवतात आणि म्हणतात,'मी असं कधी म्हणालो?'
View this post on Instagram
'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाचा आणखी एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रोमोमध्ये अभिजीत बिचुकले हे इंग्रजी भाषेत बोलताना दिसत आहेत. ते म्हणतात, 'मी इंग्लिशमध्ये असं बोलतो ना की, कळणार नाही हे शब्द डिक्शनरीमध्ये कुठे लिहिले आहेत.'
View this post on Instagram
'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाच्या अभिजीत बिचुकले यांच्या एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा एपिसोड प्रेक्षक 10 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता पाहू शकतात.
बिग बॉस या कार्यक्रमामुळे अभिजीत बिचुकले यांना विशेष लोकप्रियता मिळाली. बिग बॉस -15 (Bigg Boss 15) मध्ये अभिजीत बिचुकले यांनी सहभाग घेतला होता. तसेच मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सिझनमध्ये देखील ते सहभागी झाले होते.
संबंधित बातम्या: