(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kaun Banega Crorepati 14 : 'शतरंज के खिलाडी' आणि अमिताभ बच्चनचं खास नातं, केबीसीच्या मंचावर दिला जुन्या आठवणींना उजाळा
Amitabh Bachchan : 1977 साली प्रदर्शित झालेल्या 'शतरंज के खिलाडी' या सिनेमाचं आणि अमिताभ बच्चन यांचं खास कनेक्शन आहे.
Kaun Banega Crorepati 14 Episode 2 : 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. नुकतेच या कार्यक्रमाचे चौदावे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अमिताभ बच्चन सांभाळत आहेत. आमिर खानसह अनेक दिग्गजांनी या कार्यक्रमाचा पहिल्या भागात हजेरी लावली होती. 'शतरंज के खिलाडी' आणि अमिताभ बच्चनचं खास कनेक्शन आहे. केबीसीच्या मंचावर त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर अमिताभ बच्चन त्यांच्या आयुष्यासंबंधित अनेक मजेशीर किस्से चाहत्यांसोबत शेअर करत असतात. केबीसीच्या मंचावर छत्तीसगडच्या दुलीचंद यांना प्रश्न विचारण्यात आला की, प्रेमचंद यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव आहे? ज्या पुस्तकावर सत्यजित रे यांनी सिनेमा बनवला आहे. तसेच या प्रश्नासोबत ते चार पर्याय देतात. गबन, गोदान, शतरंज के खिलाडी, सेवा सदन.
View this post on Instagram
दुलीचंद 'शतरंज के खिलाडी' हे अचूक उत्तर देत 40 हजार रुपये जिंकतो. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी 'शतरंज के खिलाडी'बाबत एक गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली. 'शतरंज के खिलाडी' या सिनेमाचं कथानक अमिताभ बच्चन यांनी लिहिलं असल्याचं ते म्हणाले."
स्पर्धकाने जिंकले 50 लाख रुपये
'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर दुलीचंद या स्पर्धकाने 50 लाख रुपये जिंकले आहेत. 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात सहभागी होण्याची गेल्या 21 वर्षांपासून प्रतीक्षा करत होतो. 'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर येणं हे माझं स्वप्न होतं, असे धुलीचंद अग्रवाल म्हणाले. धुलीचंद यांनी तीन लाइफलाइन न घेता 50 लाख जिंकले आहेत.
संबंधित बातम्या