KBC 14 : 50 लाखांच्या प्रश्नासाठी आमिर खानला घ्यावी लागली ‘लाईफलाईन’ची मदत! तुम्हाला माहितीये का या प्रश्नाचं उत्तर?
KBC 14 : टीव्हीचा लोकप्रिय क्वीझ शो ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati 14) 14व्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
![KBC 14 : 50 लाखांच्या प्रश्नासाठी आमिर खानला घ्यावी लागली ‘लाईफलाईन’ची मदत! तुम्हाला माहितीये का या प्रश्नाचं उत्तर? KBC 14 Aamir khan used Lifeline for a question worth rupees 50 lakhs know the right answer KBC 14 : 50 लाखांच्या प्रश्नासाठी आमिर खानला घ्यावी लागली ‘लाईफलाईन’ची मदत! तुम्हाला माहितीये का या प्रश्नाचं उत्तर?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/08/9593756531e8ef18c999110225bd82751659948819_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
KBC 14 : टीव्हीचा लोकप्रिय क्वीझ शो ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati 14) 14व्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. KBC 14चा पहिला भाग नुकताच प्रदर्शित झाला, जो खूप खास होता. केबीसी 14च्या या पहिल्या भागात 'स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव' साजरा करण्यात आला. या नव्या पर्वाची सुरुवात एका भव्य सोहळ्याने झाली. या एपिसोडमध्ये बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan), कारगिल युद्धात सहभागी झालेले मेजर डीपी सिंह (Major DP Singh) आणि महिला कर्नल मिताली मधुमिता (Mitali Madhumita) यांनी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अभिनेता आमिर खान ‘केबीसी 14’च्या पहिल्या एपिसोडमध्ये हॉट सीटवर बसून हा खेळ खेळताना दिसला. आमिर खान त्याच्या आगामी 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘कौन बनेगा करोडपती 14’च्या प्रीमियरला आला होता.
50 लाखांच्या प्रश्नासाठी घ्यावी लागली ‘लाईफलाईन’!
या भागामध्ये आमिर खान, मेजर डीपी सिंह आणि कर्नल मिताली मधुमिता यांच्यासोबत प्रश्नोत्तरांचा खेळ खेळण्यात आला. दोघांनी मिळून अतिशय अवघड प्रश्नांची उत्तरे दिली, पण 50 लाखांच्या प्रश्नावर त्यांचा खेळ अडकला. उत्तर माहित नसल्याने त्यांना लाईफलाईनची मदत घ्यावी लागली. भारतीय राजकारणाशी संबंधित या प्रश्नावर तिघेही अडकले होते. प्रश्न असा होता की, यापैकी कोणत्या भारतीय राष्ट्रपती जोडीने एकमेकांना भारतरत्न प्रदान केले आहे? या प्रश्नाच्या उत्तरासाठी चार पर्याय देण्यात आले होते होते. 1) एस राधाकृष्णन- व्हीव्ही गिरी, 2) व्हीव्ही गिरी- झाकीर हुसेन, 3) झाकीर हुसेन- प्रतिभा पाटील, 4) राजेंद्र प्रसाद- एस राधाकृष्णन.
या प्रश्नावर अडकल्यानंतर स्पर्धकांनी लाईफलाईनची मदत घेतली. या प्रश्नाचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक चार म्हणजेच राजेंद्र प्रसाद- एस राधाकृष्णन. लाईफलाईनच्या मदतीने त्यांनी 50 लाखांची रक्कम जिंकली आणि ती आर्मी सेंट्रल वेल्फेअरला दान केली.
'कौन बनेगा करोडपती 14' चा नवा नियम
'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात स्पर्धक जर 1 कोटीसाठीच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार झाला आणि ते उत्तर चुकलं तर स्पर्धकाला फक्त 3 लाख 20 हजार मिळतात. पण 'कौन बनेगा करोडपती 14' मध्ये स्पर्धकाला 7.5 कोटींसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहे. या प्रश्नाचं उत्तर स्पर्धकाने चुकीचं दिलं तर, त्याला फक्त 75 लाख मिळणार आहेत. भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असल्याने यंदाच्या पर्वात खास 7.5 कोटींसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या
KBC 14 : 'कौन बनेगा करोडपती 14'चा 7 ऑगस्टला होणार प्रीमियर; आमिर खानची विशेष उपस्थिती
KBC 14 : कौन बनेगा करोडपतीमध्ये सुनील छेत्री आणि मेरी कॉम लावणार हजेरी; बिग बींसोबत मारणार मजेशीर गप्पा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)