![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Kaun Banega Crorepati 14: केबीसीच्या मंचावर खास पाहुण्यांची एन्ट्री; बिग बी झाले भावूक, प्रोमो व्हायरल
केबीसीच्या आगमी एपिसोडमध्ये काही खास पाहुण्यांची एन्ट्री होणार आहे. या पाहुण्यांना पाहून बिग बी भावूक झाले.
![Kaun Banega Crorepati 14: केबीसीच्या मंचावर खास पाहुण्यांची एन्ट्री; बिग बी झाले भावूक, प्रोमो व्हायरल kaun banega crorepati 14 amitabh bachchan got emotional to see his wife jaya bachcha and son Abhishek Bachchan Kaun Banega Crorepati 14: केबीसीच्या मंचावर खास पाहुण्यांची एन्ट्री; बिग बी झाले भावूक, प्रोमो व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/06/5d0ba9fe6b5bc72666259eb18a2271811665051567627259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kaun Banega Crorepati 14 Promo: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडती’ चा (Kaun Banega Crorepati) सध्या 14 वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिझनचे सूत्रसंचालन अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे करत आहेत. सध्या ‘कौन बनेगा करोडती-14’ च्या एपिसोडमध्ये भारतातील वेगवेगळ्या भागामधील स्पर्धक सहभागी होतात. या कार्यक्रमाच्या आगमी एपिसोडमध्ये काही खास पाहुण्यांची एन्ट्री होणार आहे. या पाहुण्यांना पाहून बिग बी भावूक झाले.
11 ऑक्टोबर 2022 रोजी अमिताभ बच्चन यांचा 80 वा वाढदिवस आहे. बिग बी हे गेली 22 वर्षांपासून केबीसी कार्यक्रमासोबत जोडले गेले आहेत. त्यांच्या 80 व्या वाढदिवसाला सरप्राइज देण्यासाठी केबीसीच्या मंचावर जया बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी हजेरी लावली. या आगामी एपिसोडचा प्रोमो नुकताच सोनी लिवच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला.
प्रोमोमध्ये दिसत आहे की, अभिषेक आणि जया यांना पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांना अश्रू अनावर होतात. जया बच्चन हे एक गोष्ट सांगतात. त्यामुळे बिग बी आणखी भावूक होतात. जया बच्चन या काय सांगतात? या प्रश्वाचं उत्तर प्रेक्षकांना एपिसोड रिलीज झाल्यावर मिळाले. हा एपिसोड 11 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
पाहा प्रोमो:
View this post on Instagram
छोट्या पडद्यावरील कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या 14 व्या सिझनची सुरुवात 7 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज झाली. या सिझनमध्ये खेळाचे काही नियम बदलले आहेत. 'कौन बनेगा करोडपती 14' मध्ये स्पर्धकाला 7.5 कोटींसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहे. या प्रश्नाचं उत्तर स्पर्धकाने चुकीचं दिलं तर त्याला 75 लाख मिळणार आहेत.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)