Kaun Banega Crorepati 14 : 'पुढच्या जन्मी मला पत्रकार व्हायचंय'; केबीसीच्या मंचावर बिग बींनी व्यक्त केली इच्छा
प्रोमोमध्ये दिसत आहे की, वैष्णवी कुमारी यांनी बिग बींना काही प्रश्न विचारण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
Kaun Banega Crorepati 14 Promo : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडती’चा (Kaun Banega Crorepati) सध्या 14 वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिझनचे सूत्रसंचालन अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे करत आहेत. सध्या कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडती-14’ च्या एपिसोडमध्ये भारतातील वेगवेगळ्या भागामधील स्पर्धक सहभागी होतात. पत्रकार वैष्णवी कुमारी या ‘कौन बनेगा करोडती-14’ च्या आगामी एपिसोडमध्ये सहभागी होणार आहेत. या एपिसोडचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, वैष्णवी कुमारी यांनी बिग बींना काही प्रश्न विचारण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
अमिताभ बच्चन काय म्हणाले?
प्रोमोमध्ये दिसत आहे की, ‘कौन बनेगा करोडती-14’च्या स्पर्धक पत्रकार वैष्णवी कुमारी या अमिताभ बच्चन यांना म्हणतात की, 'मी तुम्हाला काही प्रश्न विचारु शकते का? मला तुमची मुलाखत घ्यायची आहे.' यावर अमिताभ बच्चन म्हणतात, 'मला पत्रकारांची भिती वाटते. मला पुढच्या जन्मी पत्रकार व्हायचंय. ज्यामुळे मी लोकांना प्रश्न विचारु शकते. '
पाहा प्रोमो:
View this post on Instagram
छोट्या पडद्यावरील कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या 14 व्या सिझनची सुरुवात 7 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज झाली. या सिझनमध्ये खेळाचे काही नियम बदलले आहेत. 'कौन बनेगा करोडपती 14' मध्ये स्पर्धकाला 7.5 कोटींसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहे. या प्रश्नाचं उत्तर स्पर्धकाने चुकीचं दिलं तर त्याला 75 लाख मिळणार आहेत.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :
KBC 14 : 'कौन बनेगा करोडपती 14'ला मिळाली पहिली करोडपती स्पर्धक; प्रोमो आऊट