सुनिल ग्रोव्हरसोबतच्या भांडणावर कपिल शर्माची फेसबुक पोस्ट

नवी दिल्ली :कपिल शर्माने लिहिलं आहे की, "सुनिल आणि माझ्यात झालेल्या भांडणाची बातमी ऐकली. सर्वात आधी ही बातमी कुठून आली? या प्रकारच्या बातमीमागचा उद्देश काय? जर मी सुनिलसोबत भांडण केलं तर कोणी पाहिलं आणि माहिती दिली? ज्याने ही माहिती दिली तो विश्वासार्ह आहे? काही लोक अशा प्रकारच्या गोष्टींचा आनंद घेतात. आम्ही एकत्र खातो, एकत्र प्रवास करतो. मी माझ्या भावाला वर्षातून एकदा भेटतो, पण माझ्या टीमला प्रत्येक दिवशी भेटतो, विशेषत: सुनिलसोबत. मी त्याच्यावर (सुनिल) प्रेम करतो. त्याचा आदर करतो. होय, माझे त्याच्यासोबत वाद होतात. पण ही बाब सामान्य नाही का? मी पाच वर्षात पहिल्यांदा त्याच्यावर ओरडलो. एवढं तर चालतं, भाई... आम्ही बसून चर्चा करतो, तर अडचण कुठे आहे? एक कलाकार आणि व्यक्ती म्हणून मी त्याच्यावर प्रेम करतो."
कपिल पुढे लिहितो की, "तो माझ्यासाठी मोठ्या भावाप्रमाणे आहे. प्रत्येक वेळी अशा नकारात्मक गोष्टी का? मी मीडियाचा आदर करतो. इतरही गंभीर प्रश्न आहे, ज्यावर लक्ष देण्याची गरज आहे. माझं आणि सुनिलचं प्रकरण एवढं महत्त्वाचं आहे का आणि देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे? आम्ही दोघे आपापल्या कुटुंबीयांपेक्षा जास्त वेळ एकत्र घालवतो. कधी कधी अशी परिस्थिती कुटुंबासोबतही होते. त्यामुळे ही आमची कौंटुंबीक बाब आहे. आम्ही यावर तोडगा काढू. जास्त मज्जा घेऊ नका. लिहून लिहून मला आता दमलो. आणखी एक गोष्ट, माझ्या फिरंगी या सिनेमाच्या फायनल शेड्यूलसाठी जात आहे. हा हा हा... माफ करा. पुन्हा प्रमोशन सुरु केलं. प्रेम आणि आशीर्वादासाठी आभार. नेहमीच हसत राहा आणि आनंदी राहा. सर्वांना प्रेम" कपिल शर्माची फेसबुक पोस्ट






















