Hunarbaaz Winner : बिहारच्या आकाश सिंहनं पटकावली 'हुनरबाज'ची ट्रॉफी ; मिळालं लाखोंचं बक्षीस
Hunarbaaz Winner : आकाश सिंह हा हुनरबाज या कार्यक्रमाचा विजेता ठरला आहे.

Hunarbaaz Winner : छोट्या पडद्यावरील हुनरबाज या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला आहे. या कार्यक्रमाचा आकाश सिंह (Akash Singh) हा विजेता ठरला आहे. आकाशला ट्रॉफी आणि 15 लाख देण्यात आले. रनर-अप ठरलेल्या यो हायनेस या टीमला पाच लाख रूपये मिळाले. विजेता ठरलेला आकाश ट्रॉफी मिळाल्यानंतर भावूक झाला.
एका मुलाखतीमध्ये आकाशनं त्याच्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, मी खूप खुश झालो आहे. माझे संपूर्ण कुटुंब आनंदी झाले आहे. जे स्वप्न मी पाहिले होते, ते पूर्ण झाले आहे. जेव्हा मी हा कार्यक्रमाचा विजेता ठरलो, तेव्हा माझे आई- वडील हे माझ्यासोबतच होते. ते दोघेही खूप आनंदी झाले. जेव्हा मी ऑडिशनसाठी आलो होतो तेव्हा मला वाटत नव्हते की मी या कार्यक्रमाचा विजेता ठरेल कारण तिथे खूप टॅलेंटेड लोक होते. पण शोमध्ये एन्ट्री केल्यानंतर मी मेहनत केली. '
आकाशनं त्याच्या घडतर प्रवासाबद्दल देखील मुलाखतीमध्ये सांगितलं. तो म्हणाला, 'मी 2018 मध्ये मुंबईमध्ये कार्यक्रमाच्या ऑडिशनसाठी आलो. पण तेव्हा माझं सिलेक्शन झालं नाही. पण त्यानंतर मी गावाला परत गेलो नाही. इथेच मेहनत केली. परत ऑडिशन दिल्यानंतर मी सिलेक्ट झालो. '
View this post on Instagram
आकाश हा बिहारमधील भागलपूर या गावामधून मुंबईमध्ये आला होता. हुनरबाज कार्यक्रमाच्या ऑडिशनमध्ये आकाशनं सांगितलं की त्यानं दूध विकणे तसेच वॉचमॅन अशी कामं केली. अनेक वेळा तो उपाशी झोपला होता. आकाशच्या या घडतर आयुष्याबद्दल ऐकून त्यावेळी परिणिती चोप्रा भावूक झाली होती.
हेही वाचा :
- TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Kitchen Kallakar : 'किचन कल्लाकार'मध्ये राजकीय मेजवानी; कॉंग्रेस, भाजप आणि मनसेचे 'हे' बडे नेते लावणार हजेरी
- Jayeshbhai Jordaar Poster : 'जयेशभाई जोरदार'चे पोस्टर रिलीज; रणवीरने विचारलं, जयेशभाईंना मुलगा होणार की मुलगी?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
