Harshada Khanvilkar: मध्यमर्गीय कुटुंबात गेलं बालपण, अक्कासाहेब होऊन प्रेक्षकांच्या मनावर गाजवलं अधिराज्य; जाणून घ्या अभिनेत्री हर्षदा खानविलकरबद्दल
जाणून घेऊयात हर्षदाच्या (Harshada Khanvilkar) बालपणाबद्दल आणि तिच्या मालिकांबद्दल...
Harshada Khanvilkar: अभिनेत्री हर्षदा खानविलकर (Harshada Khanvilkar) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla), पुढचं पाऊल (Pudhcha Paaul), ऊन पाऊस (Oon Paus) यांसारख्या मालिकांमध्ये हर्षदानं काम केलं आहे. हर्षदाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकांना माहित नसेल. जाणून घेऊयात हर्षदाच्या बालपणाबद्दल...
हर्षदा खानविलकरनं एका मुलाखतीमध्ये तिच्या बालपणाबद्दल सांगितलं होतं. ती म्हणाली होती, 'मध्यमर्गीय कुटुंबात माझं बालपण गेलं. दहा बाय दहाच्या घरात माझं बालपण गेलं. पैशाची चणचण असायची. माझ्या वडिलांनी मला खूप स्वातंत्र दिलं. माझ्या वडिलांचे 59 व्या वर्षी निधन झाले. दीड महिना ते व्हेंटिलेटरवर होते.' हर्षदा खानविलकरनं या मुलाखतीमध्ये सांगितलं की, तिनं कॉलेजमध्ये असताना नाटकामध्ये काम केलं.
हर्षदा खानविलकरनं मुलाखतीमध्ये तिच्या पहिल्या मालिकेबद्दल सांगितलं, 'माझे एक फॅमिली फ्रेंड होते. त्यांनी माझे काही फोटो काढले होते. त्यामधील एक फोटो एका मासिकामध्ये छापून आला होता. तो फोटो नीना गुप्ता यांनी पाहिला होता. नीना गुप्ता यांनी मला फोन करुन दर्द नावाच्या मालिकेबद्दल विचारलं होतं. त्या मालिकेत मी काम केलं.'
View this post on Instagram
अक्कासाहेब भूमिकेमुळे मिळाली विशेष लोकप्रियता
'पुढचं पाऊल' या मालिकेतील अक्कासाहेब या भूमिकेमुळे हर्षदाला विशेष लोकप्रियता मिळाली. या भूमिकेबाबत हर्षदा खानविलकरनं सांगितलं, 'माझिया प्रियाला प्रीत कळेना या शोमध्ये मी तेव्हा काम करत होते. त्या शोमध्ये मी व्हिलनची भूमिका साकारत होते. ज्या दिवशी तो शो संपला. त्याचं दिवशी पुढचं पाऊल या मालिकेच्या शूटिंगचा पहिला दिवस होता. रोहिणी यांची गोष्ट, मिथिला सुभाष यांची वाक्य आणि वैभव चिंचाळकर यांचे दिग्दर्शन यांनी अक्कासाहेब ही भूमिक घडवली.'
View this post on Instagram
अस्तित्व एक प्रेम कहानी, ऑल द बेस्ट, कमांडर या हिंदी मालिकांमध्ये देखील हर्षदा खानविलकरनं काम केलं आहे.
यवाचा इतर महत्वाच्या बातम्या: