Dance Maharashtra Dance : 'डान्स महाराष्ट्र डान्स' लवकरच होणार सुरू; सूत्रसंचालकाच्या भूमिकेत संदीप पाठक
Dance Maharashtra Dance : 'डान्स महाराष्ट्र डान्स' या कार्यक्रमात सूत्रसंचालकाच्या भूमिकेत संदीप पाठक दिसणार आहे.
Dance Maharashtra Dance Little Masters : 'डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स' (Dance Maharashtra Dance Little Masters) हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमासाठी बच्चेकंपनी उत्सुक आहे. कारण या कार्यक्रमाचं स्वरूप काहीस वेगळं असणार आहे. या कार्यक्रमात सूत्रसंचालकाच्या भूमिकेत संदीप पाठक (Sandeep Pathak) दिसणार आहे.
चिंचि चेटकीण या कार्यक्रमात तिची जादू दाखवणार आहे. त्यामुळे छोट्या दोस्तांना या कार्यक्रमातून अफाट मनोरंजन मिळणार यात शंकाच नाही. सोनाली कुलकर्णी आणि गश्मीर महाजनी हे दोघे या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका निभावणार आहेत. पण या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक कोण असेल हा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय. तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे अभिनेता संदीप पाठक.
View this post on Instagram
आपल्या या नवीन भूमिकेबद्दल बोलताना संदीप पाठक म्हणाला, "आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यामध्ये एक लहान मुलं दडलेलं असतं आणि आपण सर्वजण बालपणात रमतो. 'डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स' हा कार्यक्रम प्रेक्षकांना त्यांच्या लहानपणीच्या दिवसांना उजाळा देईल. या कार्यक्रमातील स्पर्धक खूपच टॅलेंटेड आहेत. त्यामुळे मी त्यांचा डान्स एन्जॉय करणार आहे. तसेच स्पर्धक, चेटकीण, परीक्षक, प्रेक्षक यांच्यामधला मी सुसंवाद बनणार आहे. मंचावर एक खेळीमेळीचं वातावरण ठेवून कार्यक्रमात एक एनर्जी पेरायची जबाबदारी माझी आहे."
डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स
कुठे पाहायला मिळेल? झी मराठी
कधी पाहायला मिळेल? 27 जुलैपासून बुधवार आणि गुरुवार रात्री 9.30 वाजता
महाराष्ट्रातील बालकलाकार 'डान्स महाराष्ट्र डान्स'मध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सध्या ‘डान्स महाराष्ट्र डान्स’च्या ऑडिशन होत आहेत. ऑडिशनद्वारे लिटिल मास्टर्सची निवड करण्यात येणार आहे. हे लिटिल मास्टर ‘डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स’चा किताब पटकवणार आहेत.
संबंधित बातम्या