Dance Maharashtra Dance : ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार, ‘हा’ अभिनेता सांभाळणार परीक्षकाची भूमिका!
Dance Maharashtra Dance : झी मराठीवर लवकरच डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Dance Maharashtra Dance : झी मराठीवर लवकरच डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘चिंचि चेटकीण’ या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून खास स्पर्धक शोधून आणतेय. पण, या कार्यक्रमात परीक्षक कोण असणार हा प्रश्न सर्व प्रेक्षकांना पडला आहे. या कार्यक्रमात परीक्षकाच्या खुर्चीत एक हरहुन्नरी अभिनेता, डान्सर आणि कोरिओग्राफर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) आहे. आपल्या अभिनय कौशल्यासोबतच गश्मीर एक उत्तम डान्सर आणि कोरिओग्राफर आहे हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणूनच त्याला ‘डान्स महाराष्ट्र डान्स’मध्ये (Dance Maharashtra Dance) परीक्षकाच्या खुर्चीत पाहून प्रेक्षकांना खूप आनंद होईल यात शंकाच नाही.
झी मराठी लवकरच 'डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स' हा कथाबाह्य कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा कार्यक्रम खास लहान मुलांसाठी असणार आहे. 'डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स' या कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी छोट्या दोस्तांची आवडती चिंचि चेटकीण लिटिल मास्टर्स शोधणार आहे.
मनोरंजन करण्यासाठी आम्ही सज्ज!
आपल्या या जबाबदारीच्या भूमिकेबद्दल बोलताना गश्मीर म्हणाला की, ‘हा माझा पहिलाच डान्स रिऍलिटी शो आहे, ज्यात मी सहभागी होतोय आणि तेही परीक्षकाच्या भूमिकेत, याचा मला खूप आनंद आहे. हा कार्यक्रम स्वीकारण्यामागे महत्वाचं कारण म्हणजे लहान मुलांसोबत होणारं इंटरॅक्शन. माझं लहान मुलांसोबत कनेक्शन खूप छान जुळतं. त्याचसोबत या कार्यक्रमात मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर काम करताना दिसेन. प्रेक्षकांनी आता पर्यंत मला विविध चित्रपटांत पाहिलं आहे. एका अभिनेत्या पलीकडे मी एक उत्तम डान्सर आणि कोरिओग्राफर आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे मला अनेकदा मला विचारणा व्हायची की, मी डान्सशी निगडित काही करणार आहे का? तर हो आता ती वेळ अली आहे. प्रेक्षकांची जी अपूर्ण इच्छा होती मला डान्सशी निगडित काहीतरी करताना पाहायची ती आता पूर्ण होईल. कारण, प्रेक्षकांना या कार्यक्रमात मी परीक्षण करताना, कधीतरी थिरकताना आणि डान्सशी संबंधित बोलताना दिसेन. या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं भरगोस मनोरंजन करण्याचं माझं ध्येय आहे, तर लवकरच भेटू डान्स महाराष्ट्र डान्समध्ये.’
संबंधित बातम्या