एक्स्प्लोर

अल्पविराम नाही, सीआयडी मालिका बंदच!

सीआयडीचं नेमकं झालंय काय ही कोंडी फुटता फुटत नव्हती. पण आता आपण त्या कोंडीचा दरवाजा तोडलेला आहे. बाबो...

दया, कुछ तो गडबड है.. यह ऐसे हुआ कैसे.. किसने किया यह.. इसकी सजा तो मिलेगी... हे डायलॉग्ज आपल्याला नवे नाहीत ना. पण आयरनी अशी की असंच काहीसं झालं ते सीआयडीच्या टीमसोबत. आता बघा हं विचार करा, तब्बल 20 वर्षं जी सीरिअल सुरु आहे, ज्या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं ती मालिका जर बंद करायचीच झाली, तर कशी बंद होईल? अरे त्याला ग्रॅण्ड सेंडऑफ मिळेल की नाही? पण असं काही झालं नाही. म्हणूनच कुछ तो गडबड है.. सीआयडी बंद होण्याच्या बातम्या आल्यानंतर, अहो...आम्ही ही मालिका बंद करत नाही. हा अल्पविराम असून आम्ही ती नव्या रुपात आणू, असं चॅनल सांगतं. पण हा अल्पविराम किती अल्प असेल हे सांगायला ते तयार नाहीत. वरवर दोन महिने असं सांगितलं जातं. पण तसं नाही. सीआयडीचं नेमकं झालंय काय ही कोंडी फुटता फुटत नव्हती. पण आता आपण त्या कोंडीचा दरवाजा तोडलेला आहे. बाबो... बातमी अशी की सीआयडी मालिका बंदच झाली आहे. ती पुढे सुरु होण्याची शक्यता नाही. डिप्लोमॅटिकली बोलायचं, तर हा विराम अल्प नाही. त्यातल्या कलाकारांनाही याबद्दल फार काही माहित नाही. आता सीआयडीचे फॅन किती आहेत सांगा.. तर ही मालिका बंद होतेय हे कळल्यावर एका सीआयडी वेड्या व्यक्तीने थेट चॅनलमध्ये फोन केला. त्यांचं नाव काय होतं माहितीय? शी इज नन अदर दॅन लता मंगेशकर. लतादीदींनी फोन केला चॅनलला. तर त्यांनाही फार काही वेगळं उत्तर मिळालं नाही. सीआयडीवर होणाऱ्या खर्चाचं कारण निर्मात्याला दिलं आहे. आता ‘दस का दम’ किंवा तत्सम कार्यक्रमांचं बजेट किती हे वेगळं सांगायला नको. पण खर्च हे निमित्त झालं. पण चॅनललाच ही मालिका चालवायची नाही. सीआयडीमधल्या कलाकारांनीही याची आयडिया नाही. एक नक्की, चॅनलला ही मालिका थांबवावी वाटूच शकतं. पण त्याला काहीतरी रीत असायला हवी. खरंतर, एक ग्रॅण्ड सेंडऑफ या टीमला देता आला असता. तब्बल वीस वर्षं काम केल्यावर दे डिजर्व बेस्ट सेंड ऑफ. एनी वे,सांगायचा मुद्दा असा की सीआयडी बंद झाली आहे. आपण आपापल्या मनात एसीपी प्रद्युम्न, फ्रेडी, दया, अभिजीत, साळुंखे आदींना निरोप देऊ. लई वाईट झालं राव. सीआयडी..असायला हवी होती. देशाच्या अंतर्गत संरक्षण व्यवस्थेला अचानक मोठं भगदाड पडल्यासारखं झालंय. काय सांगायचं आता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget