Bigg Boss Marathi Season 5 Ghanshyam Darode : अखेर छोटा पुढारीने मनातील खदखद बाहेर काढली, डीपी दादाकडे घन:श्याम ढसाढसा रडला
Bigg Boss Marathi Season 5 Ghanshyam Darode : छोटा पुढारी घन:श्याम दरोडेने आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. घन:श्यामने धनंजय पोवार अर्थात डीपी दादाकडे आपलं मन मोकळं केले.
![Bigg Boss Marathi Season 5 Ghanshyam Darode : अखेर छोटा पुढारीने मनातील खदखद बाहेर काढली, डीपी दादाकडे घन:श्याम ढसाढसा रडला Chhota Pudhari Ghanshyam Darode can't control emotion crying in front of Dhananjay Powar Ghanshyam troll on his height and physique Bigg Boss Marathi New Season Bigg Boss Marathi Season 5 Bigg Boss Marathi Season 5 Ghanshyam Darode : अखेर छोटा पुढारीने मनातील खदखद बाहेर काढली, डीपी दादाकडे घन:श्याम ढसाढसा रडला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/07/c4b5bdfe3421ccbe03d7223d9f1d269b1723009376003290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bigg Boss Marathi New Season Day 11 : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi New Season) घरात काल पहिलं कॅप्टनसीचे टास्क पार पडले. 'कॅप्टनसीची बुलेट ट्रेन' असे या कॅप्टनसी टास्कचे नाव होते. या टास्कमध्ये 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरने बाजी मारली. त्यामुळे अंकिता ही यंदाच्या सीझनची घरातील पहिली कॅप्टन झाली. बिग बॉसच्या घरात या घडामोडी घडत असताना दुसरीकडे छोटा पुढारी घन:श्याम दरोडेने (Ghanshyam Darode) आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. घन:श्यामने धनंजय पोवार अर्थात डीपी दादाकडे आपलं मन मोकळं केले.
अंकिता वालावलकर ही टास्कमध्ये विजयी झाल्याने 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनला पहिला कॅप्टन मिळाला. पण दुसरीकडे आपल्याला कॅप्टन होता आलं नाही म्हणून अरबाज, निक्की, वैभव, जान्हवी यांचा राग अनावर होतो. घन:श्यामला खूप वाईट वाटतं. अंकिता कॅप्टन झाल्यावर डीपी अंकिताला थेट उचलून कॅप्टनच्या खोलीत नेतात. तर अभिजीत तिच्यासाठी गाणं म्हणतो. यानंतर गेम अनफेअर झाला म्हणून घन:श्याम ओक्साबोक्शी रडू लागतो.
'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो आउट झाला आहे. या प्रोमोमध्ये 'छोटा पुढारी' घन:श्याम दरोडे धनंजय पोवारकडे आपल्या मनातील भावना व्यक्त करताना दिसून येत आहे. टास्कमध्ये हरल्याने घन:श्यामला खूप वाईट वाटत आहे. धनंजयकडे येऊन घन:श्याम म्हणतो की,"माझ्या घरच्यांना म्हणायचंय तुमचा मुलगा काही करू शकत नाही आहे. उंची नाही त्यामुळे लोकंही म्हणतात यांचा मुलगा 'बिग बॉस'मध्ये गेलाय कसा?''. यावर घन:श्यामला समजावत धनंजय म्हणतो,"शरीराची उंची मापता आली नाही, त्याला मनाची उंची काय मापता येणार?" असे म्हणत डीपी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो.
View this post on Instagram
बिग बॉसच्या घरात घन:श्याम दरोडेने आपल्या हजरजबाबीपणाने लोकांची मने जिंकली आहेत. घन:श्याम सध्या अरबाज, निक्की, वैभव, जान्हवी यांच्या ग्रुपमध्ये वावरत आहे. पहिल्या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये घरातील वादावादी आणखीच वाढली. त्यानंतर आता अंकिता वालावलकर 'बिग बॉस मराठी'च्या घरात आता कॅप्टन म्हणून वावरणार आहे. दिलेल्या जबाबदाऱ्या ती कशी पूर्ण करणार? कामे वाटताना घरातील सर्व सदस्यांना समान न्याय देईल का? तिला घरातील लोक साथ देणार का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
--------------
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)