(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Boss Mazi Ladachi : 'बॉस माझी लाडाची' मालिकेत मिहीर आणि राजेश्वरी अडकणार लग्नबंधनात; लगीनघाईला सुरुवात
Boss Mazi Ladachi : 'बॉस माझी लाडाची' मालिकेत मिहीर आणि राजेश्वरी लग्नबंधनात अडकणार आहेत.
Boss Mazi Ladachi : 'बॉस माझी लाडाची' (Boss Mazi Ladachi) या मालिकेत बॉस आणि मिहीर यांच्यात शाब्दिक वाद, प्रेमाचं नाटक हे सगळंच प्रेक्षकांना बघायला मजा येत होती. बॉस आणि मिहीर यांचं लग्न एक डील असलं, तरीही इतर लग्नांप्रमाणेच सगळे विधी याही लग्नात बघायला मिळतील.
माहिराज हॅशटॅग सोशल मीडियावर चर्चेत
सोशल मीडियावर माहिराज असा हॅशटॅग तयार झाला असून त्यांचे चाहते या लग्नासाठी फारच उत्सुक आहेत. नुकतंच या दोघांचं मराठमोळं प्रीवेडिंग फोटोशूट सगळ्यांना बघायला मिळालं. नेहेमी पाश्चिमात्य कपड्यांमध्ये दिसणारी बॉस या वेळेस मराठमोळी नऊवारी साडी, मराठमोळे दागिने यांमध्ये दिसली. तर मिहीरसुद्धा कुर्ता आणि धोतर या पोशाखात दिसला. मालिकेत यांच्या लग्नाची बैठक झाली. हळद, संगीत, मेहंदी, बांगड्या भरणं असे सगळे विधी झाले आहेत आणि आता लगीनघाई सुरू झाली आहे.
बॉस आणि कर्मचारी यांचं लग्न प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर पहिल्यांदाच बघायला मिळणार आहे. हर्षे आणि मांजरेकर कुटुंबांत मेहेंदी, हळद, संगीत, बांगड्या भरणे यांबरोबरचच वरमाला, सप्तपदी हे विधीही बघायला मिळतील. बॉसला या सगळ्या गोष्टी आवडत नसल्या तरीही कंपनी वाचवण्यासाठी रीतसर विधिवत लग्न करायला तिने मिहीरला होकार दिला. आजपासून मिहीर आणि बॉस यांचं विधिवत लग्न पार पडणार असून ते निर्विघ्नपणे पार पडणार का, मिहीरची आजी म्हणजेच आऊ लग्नाला मनापासून संमती देणार का, बॉसचे काका-काकू लग्नात काही गडबड तर करणार नाहीत ना; या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना आता मिळणार आहे.
अभिनेत्री भाग्यश्री लिमये (Bhagyashree Limaye) आणि अभिनेता आयुष संजीव (Aayush Sanjeev) या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. भाग्यश्रीने याआधी 'घाडगे अँड सून' या मालिकेत अमृता प्रभुणे ही व्यक्तिरेखा साकारली होती. तिच्या या व्यक्तिरेखेचे प्रेक्षकांकडून खूप कौतुक झाले होते. 'बॉस माझी लाडाची' या मालिकेत ती खडूस बॉसच्या भूमिकेत दिसत आहे.
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.
संबंधित बातम्या