Bigg Boss 18 : बिग बॉसमध्ये गेल्यामुळे अनिरुद्धाचार्य ट्रोल, आता मागितली माफी; म्हणाले, "सर्व सनातनी..."
Aniruddhacharya Apology : बिग बॉसमध्ये गेल्यामुळे ट्रोल झालेले अध्यात्मिक गुरु अनिरुद्धाचार्य यांनी आता माफी मागितली आहे.
Aniruddhacharya Apologises For Entering In Bigg Boss 18 : बिग बॉसच्या नवीन 18 व्या सीझनला धमाकेदार पद्धतीने सुरुवात झाली आहे. 6 ऑक्टोबरला बिग बॉस 18 चा ग्रँड प्रीमियर पार पडला. या ग्रँड प्रीमियरला अध्यात्मिक गुरु अनिरुद्धाचार्य यांनी हजेरी लावली होती. सलमान खानच्या शोमध्ये गेल्याने त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागला. बिग बॉस सीझन 18 मध्ये गेल्यामुळे अनिरुद्धाचार्य यांना जोरदार ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. अनिरुद्धाचार्य यांनी सनातन धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर सोशल मीडियावर होऊ लागला. या ट्रोलिंगनंतर अनिरुद्धाचार्य यांनी समर्थकांची माफी मागितली आहे.
बिग बॉसमध्ये गेल्यामुळे अनिरुद्धाचार्य ट्रोल
अध्यात्मिक गुरु अनिरुद्धाचार्य यांनी बिग बॉसमध्ये सामील झाल्याबद्दल भक्तांची माफी मागितली आहे. बिग बॉस 18 च्या प्रीमियरला अनिरुद्धाचार्य महाराज विशेष पाहुणे म्हणून पोहोचले होते. या वादग्रस्त शोमध्ये अनिरुद्धाचार्य महाराजांना पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी त्यांना ट्रोल केलं. त्यांच्या समर्थकांनीही यावर निराशा व्यक्त केली. आता अनिरुद्धाचार्य यांनी ट्रोलिंगला प्रत्युत्तर देत माफी मागितली आहे. यासोबतच त्यांनी सलमान खानला गीता भेट देण्याचं कारणही सांगितलं आहे.
अनिरुद्धाचार्य का ट्रोल होण्याचं कारण काय?
काही महिन्यांपूर्वी, मीडियाशी बोलताना, जेव्हा महाराजांना बिग बॉस 18 शोमध्ये जाण्याबद्दल विचारण्यात आलं होतं, तेव्हा ते म्हणाले होते की, मला त्यांच्याकडून ऑफर आली आहे, पण मी त्यासाठी तयार नाही. तिथले वातावरण माझ्या वातावरणाशी जुळत नाही, जिथे अध्यात्मिक, धार्मिक आणि भक्तिमय वातावरणाचा असेल, तिथे मी जाण्याचा विचार करु शकतो. पण सध्या बिग बॉसमध्ये जाण्याचा विचार नाही, असं त्यांनी त्यावेळी सांगितलं आहे.
अनिरुद्धाचार्य यांनी माफी मागितली
अनिरुद्धाचार्य म्हणाले की, "काही लोक असा गैरसमज पसरवत आहेत की, मी बिग बॉसमध्ये गेलो होतो. जो तिथे जातो तो तीन महिन्यांसाठी घरात जातो. मला ऑफर होती, पण ती ऑफर मी नाकारली. बिग बॉस शोचा भाग नाही. कलर्सच्या टीमने मला घरात जाणाऱ्या 18 सदस्यांना आशीर्वाद देण्यासाठी येण्यास सांगितलं, तर तुम्ही मला सांगा की, मी पाहुणे म्हणून शोमध्ये जाणं योग्य होतं की नाही. मी तिथे पाहुणा म्हणून का गेलो त्यामागचं कारण म्हणजे संताने फक्त चांगल्या ठिकाणी जावे की, वाईट ठिकाणी जाऊन वाईट लोकांनाही योग्य मार्गावर आणावे.
View this post on Instagram
सलमान खानला 'गीता' देण्यामागचं कारण सांगितलं
अनिरुद्धाचार्य यांनी सलमान खानला भगवद्गीता भेट देण्यामागचं कारणही सांगितलं आहे. अनिरुद्धाचार्य यांनी म्हटलं की, "सर्व तरुणवर्ग बिग बॉस शोसोबत जोडले गेले आहेत. मी तिथे गेलो आणि त्यांना भगवद्गीता दिली, तर गीतेचा प्रसार होईल, यासाठी मी त्यांना गीता दिली".
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :