(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss Marathi : निक्की आणि जान्हवीच्या डोळ्यात पहिल्यांदा भीती दिसली, अब आएगा मजा...; सूरजचा रुद्रावतार पाहून नेटकरी खूश
Bigg Boss Marathi 5 This Week : बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन्सी टास्कमध्ये सूरज चव्हाणने अरबाज पटेल, निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर यांना चांगलीच टफ फाईट दिल्याचं दिसत आहे.
Bigg Boss Marathi New Season Day 20 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात हा आठवडा अतिशय रोमांचक ठरल्याचं पाहायला मिळत आहे. या आठवड्यातील नॉमिनेशन कॅप्टन्सी टास्कमध्ये सदस्यांचा राडा पाहायला मिळाला. टीम B ला हरवून टीम A कॅप्टन्सी टास्क जिंकली असून आता त्यांच्या सदस्यांमधेच टास्क पार पडणार आहे. त्यामुळे कॅप्टन्सी टास्कमध्ये नवी रोमांच पाहायला मिळणार आहे. त्यातच सूरज चव्हाण इतर सदस्यांना भिडताना दिसणार आहे.
'निक्की आणि जान्हवीच्या डोळ्यात पहिल्यांदा भीती दिसली'
बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमोमध्ये सूरज चव्हाण वैभव आणि अरबाजला गुलीगत भिडताना दिसत आहे. कॅप्टन्सी मिळवण्यासाठी सूरजने घरात पार धुडगूस घातल्याचं पाहायला मिळत आहे. सूरजवर दादागिरी करणाऱ्या वैभववर सूरज चांगलाच शाब्दिक मारा करतो. त्यानंतर सूरज अरबाजला एकटा भिडतो. त्याचं रौद्र रुप पाहून निक्की आणि जान्हवीही घाबरतात आणि मदतीसाठी अरबाजच्या नावाने हाक मारतात असं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
सूरज चव्हाणचा रुद्रावतार पाहून नेटकरी खूश
कॅप्टन्सी टास्कमध्ये सूरज चव्हाणचा चांगला गेम पाहायला मिळत आहे. खेळ कॅप्टन्सीचा असला तरी घरात कल्ला मात्र गुलिगत किंग सूरज चव्हाणचा पाहायला मिळणार आहे. सूरजचा लयभारी अवतार बिग बॉस प्रेमींच्या चांगलाच पसंतीस उतरल्याचं दिसत आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करत सूरज चव्हाणला पूर्ण पाठिंबा दिला आहे. कॅप्टन्सी टास्कमध्ये सूरजने अरबाज, निक्की आणि जान्हवीच्या नाकात दम केला आणि वैभवलाही शिंगावर घेतल्यावर नेटकऱ्यांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सूरज फायर हैं...
View this post on Instagram
सूरज चव्हाणला नेटकऱ्यांचा फुल्ल सपोर्ट
नेटकरी सोशल मीडियावर कमेंट करत सूरज चव्हाणला फुल्ल सपोर्ट देत आहे. टीव्ही अभिनेत्री अक्षया नाईक हिने कमेंट करत लिहिलंय, "निक्की आणि जान्हवीच्या डोळ्यात पहिल्यांदा भीती दिसली, अब आएगा मजा". बिग बॉस मराठीचा जुना स्पर्धक आणि गायक उत्कर्ष शिंदेने लिहिलंय, "डर होना चाहिए और वो भी सामनेवाले के दिलं मे होना चाहिए. क्या बात हैं सूरज! सूरजचा आत्मविश्वास पाहून एक लाईन आठवली, जो भी मारुंगा घूसकें मारुंगा". एकाने लिहिलंय, "फायनली आपला भाऊ पेटला." दुसऱ्याने लिहिलंय, "सूरज फायर हैं". आणखी एकाने लिहिलंय, "ज्यांनी सुरजला गृहीत धरलं, कमी लेखलं, त्यांना गावरान झटका बसलाय".
महत्त्वाच्या इतर बातम्या :