(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss Marathi : "तुझ्या लेकराला कोण बघणार गं आई?", सूरजची भावनिक साद; घरच्यांशी फोनवर बोलताना सदस्य झाले इमोशनल
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीमधील सदस्यांच्या आज अश्रूंचा बांध फुटणार आहे. घरच्यांसोबत फोनवर बोलताना सर्वजण ढसाढसा रडताना दिसणार आहे.
Bigg Boss Marathi New Season Day 20 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात आज अश्रूंचा महापूर येणार आहे. भावनांच्या खेळात भावशून्य झालेले सर्व सदस्य घरच्यांसोबत फोनवर बोलताना भावनिक झालेलं पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात नेहमी हंगामा करणारे सदस्य भावूक झाल्याचे दिसत आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात कधी कोण कोणाचा मित्र होईल आणि कोण कधी कोणाचा दुश्मन होईल हे सांगणं कठिण आहे. त्यामुळे सदस्यांना आपल्या कुटुंबियांची आठवण येणं स्वाभाविक आहे.
बिग बॉसमध्ये सदस्यांच्या अश्रूंचा बांध फुटणार
'बिग बॉस मराठी'चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये सदस्यांच्या अश्रूंचा बांध फुटलेला पाहायला मिळत आहे. घरच्यांना फोन लावताच सदस्य ढसाढसा रडताना दिसून येत आहेत. प्रोमोमध्ये 'बिग बॉस' म्हणत आहेत,"सदस्यांनी साधला जीवलंगासोबत आपुलकीचा संवाद". बिग बॉस मराठीमधील सदस्यांच्या आज अश्रूंचा बांध फुटणार आहे. घरच्यांसोबत फोनवर बोलताना सर्वजण ढसाढसा रडताना दिसणार आहे. घरच्यांसोबत फोनवर बोलताना घरातील सर्वच सदस्य इमोशनल झाल्याचं पाहायला मिळणार आहे.
"आता तुझ्या लेकराला कोण बघणार गं आई?"
कलर्स मराठीने शेअर केलेल्या नवीन प्रोमोमध्ये सर्व सदस्य फोनवर घरच्यांसोबत संवाद साधताना दिसत आहेत. वर्षा उसगांवकर फोनवर बोलतात की, "मला आज तुझी खूप आठवण येत होती". तर अंकिता वालावलकर बोलतो, "तुझ्या वांगडा शेवटचा बोलायचा रव्हला रे". तर सूरज चव्हाण भावनिक साद घालत बोलतो, "आता तुझ्या लेकराला कोण बघणार आई?" या सदस्यांसह पॅडी, जान्हवी, धनश्याम, अरबाज या सदस्यांच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत.
View this post on Instagram
एकमेकांसोबत भिडणारे सदस्य भावना व्यक्त करणार
'बिग बॉस मराठी'चा आजचा भाग पाहताना 'बिग बॉस'प्रेमींनादेखील अश्रू अनावर होणार आहेत. नेहमी एकमेकांसोबत भिडणारे सदस्य आजच्या भागात आपल्या माणसांकडे आपल्या मनातील भावना व्यक्त करताना दिसणार आहेत.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :