Bigg Boss Marathi Season 5 Latest News : ''हे असले चाळे करुन टीआरपी इथूनच...'' बिग बॉस मराठीच्या प्रोमोवर प्रेक्षकांचा संताप
Bigg Boss Marathi Season 5 Latest News : यंदा बिग बॉसच्या घरात कोण असणार, याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे कलर्स मराठी वाहिनीवर स्पर्धकांबाबत हिंट देणारी पोस्ट केली जात आहे. त्याच एका प्रोमोवर आता प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे.
Bigg Boss Marathi Season 5 Latest News : छोट्या पडद्यावर आता 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi Season 5) या रिएल्टी शोचा पाचवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जवळपास दोन वर्षानंतर बिग बॉस मराठीचा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. यंदाच्या सीझनमध्ये बिग बॉस मराठीचा होस्ट अभिनेता रितेश देशमुख असणार आहे. दिग्दर्शक-निर्माते महेश मांजरेकर यांच्या ऐवजी आता रितेशकडे शोची धुरा असल्याने बिग बॉसच्या यंदाचा सीझन कसा असणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. यंदा बिग बॉसच्या घरात कोण असणार, याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे कलर्स मराठी वाहिनीवर स्पर्धकांबाबत हिंट देणारी पोस्ट केली जात आहे. प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारे प्रोमोदेखील रिलीज केले जात आहेत. त्याच एका प्रोमोवर आता प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे.
बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरू होण्यासाठी आता काही दिवसांचा अवधी राहिला आहे. बिग बॉस मराठीचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी कलर्स मराठीच्या सोशल मीडिया अकाउंटवर प्रोमो आणि सहभागी होणारे प्रेक्षक कोण असणार, याबाबत हिंट देणारे प्रोमो रिलीज केले जात आहेत. कलर्स मराठीवरही 'ब्रेकिंग न्यूज, स्पर्धकांच्या नावांची यादी लीक' या ग्राफिक्ससह एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काय आहे त्या प्रोमोमध्ये?
कलर्स मराठीवरही 'ब्रेकिंग न्यूज, स्पर्धकांच्या नावांची यादी लीक' या ग्राफिक्ससह एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यानंतर दोन मांजरी एकमेकांवर गुरगुरत असताना दाखवल्या आहेत आणि शेवटी एक मुलगा जोरजोरात हसताना दाखवण्यात आला आहे.
View this post on Instagram
प्रेक्षकांनी स्पष्टच म्हटले...
या प्रोमोवर नाराजी व्यक्त केली आहे. काही प्रेक्षकांना हा प्रोमो आवडला आहे. एका युजरने सावधनतेचा इशारा देताना म्हटले की, हे असले चाळे करुन टीआरपी इथूनच घसरवू नका म्हणजे झाले. तर, एकाने म्हटले की, एवढं खरंच करत आहात तर प्लीज प्रोमोची थोडी क्वालिटी वाढवा असा अनाहूत सल्लाही एकाने दिला आहे. तर, आणखी एका युजरने म्हटले की, यात काही कॉमेडी नव्हतं. आम्हाला स्पर्धकांची नाव पाहिजेत आणि ही असली रोज फालतुगिरीचे व्हिडीओ टाकतात, असे म्हटले. आणखी एका युजरने म्हटले की, बिग बॉस आता युट्युबरची मज्जा घेत आहेत, असे म्हटले.
कोणत्या कलाकारांच्या नावाची चर्चा?
बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणाऱ्या संभाव्य स्पर्धक म्हणून अनेकांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यामध्ये मराठी-हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या नावाची चर्चा आहे. अभिनेता विवेक सांगळे आणि चेतन वडनेरे हे दोघेही बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडिया स्टार अंकिता वालावलकर ही देखील बिग बॉसच्या घरात जाऊ शकते असे म्हटले जात आहे. त्याशिवाय, एक गायक आणि एक प्रसिद्ध डान्सर-अभिनेत्रीदेखील बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे.