एक्स्प्लोर

घरात माझी किंमत 40 हजारांची नाही, टास्क दरम्यान जान्हवी ढसाढसा रडली अन् पाटीच तोडली; नेमकं घडलं काय?

Bigg Boss Marathi Season 5 : आजच्या भागात बिग बॉसच्या आदेशानुसार प्रत्येक सदस्याला स्वतःची किंमत ठरवावी लागणार आहे. कोणाची किंमत किती ठरणार?

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस (Bigg Boss Marathi) मराठीच्या पाचव्या सीझनच्या फिनाले विकला आजपासून सुरुवात होणार आहे. आजपासून बिग बॉस सीझनमध्ये अनेक ट्वीस्ट आणणार यात काही शंकाच नाही. आजच्या भागाचा प्रोमो कलर्स मराठीच्या ऑफिशियल इंन्स्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला आहे. प्रोमोनुसार, आजच्या भागात बिग बॉसच्या आदेशानुसार प्रत्येक सदस्याला स्वतःची किंमत ठरवावी लागणार आहे. या टास्क दरम्यान, जान्हवी किलेकरच्या (Jahnavi Killekar) वाट्याला 40 हजारांची किंमत येते, मग जान्हवी ती स्विकारण्यास स्पष्ट नकार देते आणि 40 हजारांची पाटीच तोडून टाकते. यावेळी एरव्ही आपल्या दादागिरीनं भल्या भल्यांची भंबेरी उडवणारी जान्हवी ढसाढसा रडताना दिसते. 

प्रोमोमध्ये नेमकं काय घडतं? 

फिनाले विकच्या पहिल्या दिवशी बिग बॉस घरातील सदस्यांना एक टास्क देतात. टास्कमध्ये सर्व सदस्यांना घरातली आपापली किंमत ठरवायची असते. त्यानुसार, प्रत्येक सदस्या आपापली किंमत ठरवतात. सुरुवातीला अभिजीत म्हणतो की, "दोन लाखांची पाटी मी अंकिताला देईन." यावर निक्की अभिजीतला म्हणतेय, "मग तू चाळीस हजारांची पाटी जान्हवीला देणार आहेस का?" अभिजीत निक्कीला म्हणाला, "माझ्याकडे ऑप्शन नाही आहे." यावरून डीपी दादा अभिजीतला म्हणाले, "मलाही वाटतं की, तू ही गोष्ट करावीस." यावरून जान्हवी बिग बॉसला उद्देशून म्हणाली, "या घरातील चाळीस हजारांची किंमत माझी नाही. मी चाळीस हजारांची पाटी स्वीकारणार नाही." संतापलेली जान्हवी हातातली 40 हजारांची पाटी तोडून टाकते आणि ढसाढसा रडते. 

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

दरम्यान, आज कोणाची किंमत किती ठरणार? हे पाहाताना मजा येणार आहे. बिग बॉस मराठी सीझन 5 चा शेवटचा आठवडा आजपासून सुरू झाला आहे. 6 ऑक्टोबरला बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. रविवारी बिग बॉसच्या घरातून मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कॉमेडियन पंढरीनाथ कांबळे यांनी एग्झिट घेतली. त्यानंतर अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, वर्षा ऊसगांवकर, जान्हवी किलेकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकर असे 7 स्पर्धक फिनाले विकमध्ये पोहोचले आहेत. आता येत्या रविवारी बिग बॉस सीझन 5 ची ट्रॉफी कोण उंचावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi Season 5 : अंकिता अभिजीतवर भडकली, डिपीदादाही ओरडला; नेहमीप्रमाणे कारण निक्कीच ठरली, फिनाले विकमध्ये 'टीम B' मध्ये फूट?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Embed widget