Bigg Boss Marathi Season 5 : अंकिता अभिजीतवर भडकली, डिपीदादाही ओरडला; नेहमीप्रमाणे कारण निक्कीच ठरली, फिनाले विकमध्ये 'टीम B' मध्ये फूट?
Bigg Boss Marathi: आजपासून बिग बॉसच्या घरात फिनाले विक सुरू होणार आहे. यंदाच्या पर्वाच्या शेवटच्या आठवड्यात बिग बॉस घरातल्यांसमोर अनेक नवनवे ट्वीस्ट आणणार आहेत.
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस (Bigg Boss) मराठी सीझन 5 आता शेवटच्या आठवड्यात आला आहे. रविवारी बिग बॉसच्या घरातून मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कॉमेडियन पंढरीनाथ कांबळे (Pandharinath Kamble) यांनी एग्झिट घेतली. त्यानंतर अभिजीत सावंत (Abhijeet Sawant), निक्की तांबोळी (Nikki Tamboli), वर्षा ऊसगांवकर (Varsha Usgaonkar), जान्हवी किलेकर (Jahnavi Killekar), सूरज चव्हाण (Suraj Chavhan), धनंजय पोवार (Dhananjay Powar) आणि अंकिता वालावलकर (Ankita Prabhu Walawalkar) असे 7 स्पर्धक फिनाले विकमध्ये पोहोचले आहेत.
आजपासून बिग बॉसच्या घरात फिनाले विक सुरू होणार आहे. यंदाच्या पर्वाच्या शेवटच्या आठवड्यात बिग बॉस घरातल्यांसमोर अनेक नवनवे ट्वीस्ट आणणार आहेत. बिग बॉसच्या चक्रव्यूहातून बचावणाऱ्या स्पर्धकांना थेट तिकीट टू फिनाले मिळणार आहे. पण, त्यापूर्वी बिग बॉसच्या घरात आज काय होणार? याचा प्रोमो समोर आला आहे. प्रोमो पाहून नेटकरी पुरते चक्रावून गेले आहेत. संपूर्ण सीझन एकमेकांमधील पक्की मैत्री सांभाळणारे अभिजीत आणि अंकिता यांच्यात कडाक्याचं भांडणार होणार आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून एकजूटीनं खेळणाऱ्या टीम B मध्ये शेवटच्या आठवड्यात फूट पडणार की काय? अशी भिती नेटकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
प्रोमोमध्ये नेमकं काय सांगितलंय?
कलर्स मराठीच्या ऑफिशिअल हॅन्डलवरुन आजच्या भागाता प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये अंकिता आणि अभिजीत यांच्यात घरातील कामांच्या ड्युटीवरुन वाद झाल्याचं पाहायला मिळालं. घरातील कामाच्या वाटपावरून अंकिता व अभिजीतमध्ये वाद होतो. प्रोमोमध्ये दिसत आहे की, दोघांमधील या वादाचं निमित्त निक्की आहे. प्रोमोच्या सुरुवातीलाच अंकिता अभिजीतवर चिडल्याचं पाहायला मिळतं. "तिला डायनिंग टेबल देऊन तू अख्खा संडास-बाथरुम स्वतःवर घेतोयस...", असं काहीसं अंकिता अभिजीतला म्हणते. त्यावर अभिजीत म्हणतो, "तुला जर वाटतं ना की, तुझ्या ड्युटी जास्त आहेत, मग तू तिला बोल ना..."
View this post on Instagram
अभिजीत बोलल्यावर अंकिता संतापते आणि त्याला म्हणते, "सगळीकडे तू जेंटलमन बनून येतोस, तर ये ना इथेही जेंटलमन बनून...". त्यावर अभिजीत म्हणतो, "मी माझी ड्युटी माझ्या सुविधेप्रमाणे घेतली, त्यामध्ये मी चुकीचा काय आहे...?" यावर अंकिता चिडते आणि त्याला म्हणते, "तेव्हा तूच बोललास यार..." दोघांच्या वादात डीपीदादाही मध्ये अभिजीतवर ओरडत असल्याचं पाहायला मिळालं.
बिग बॉस मराठी सीझन 5 चा शेवटचा आठवडा आजपासून सुरू झाला आहे. 6 ऑक्टोबरला बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. अशातच, शेवटच्या आठवड्यात येऊन 'टीम बी'मध्ये फूट पडणार की काय? अशी चिंता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. तर, दुसरीकडे प्रोम पाहून नेटकऱ्यांनी अंकिताला सपोर्ट केला आहे. तर अभिजीतला झोडून काढलं आहे. निक्कीला अरबाज 3 मिळाला, असं म्हणत नेटकऱ्यांनी अभिजीतवर टिकेची झोड उठवली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :