Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरात आज येणार एलिअन
Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरात आज एलिअन कब्जा करणार आहे. त्यामुळे घरातील सदस्य घाबरलेली दिसून येणार आहेत.
Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरामधून काल नीथा शेट्टी घराबाहेर पडली आहे. आता बिग बॉसच्या घरात या पर्वाचे टॉप 10 सदस्य राहिले आहेत. त्यामुळे आता येणारे टास्क आणि सदस्यांचा घरातील प्रवास अधिक खडतर होणार आहे. काल नीथा बाहेर पडल्यानंतर बिग बॉसच्या घरात लगेचच आज नॉमिनेशन कार्यदेखील पार पडणार आहे. या आठवड्यात कोणते सदस्य नॉमिनेट होणार हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आजच्या भागत बिग बॉसच्या घरात एलिअनचा कब्जा करणार आहे. त्यामुळे घरातील सदस्य घाबरलेली दिसून येणार आहेत.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये आद घरात काहीतरी भन्नाट घडणार आहे याचा अंदाज येतो आहे. आज बिग बॉसच्या घरावर एलिअनचा कब्जा करणार आहे. प्रोमोमध्ये बिग बॉसचा आवाज येतो आहे,"घरातील सर्व सदस्यांनी लिव्हिंग एरियात जमावे". आता पुढे काय घडणार? एलिअनच्या एन्ट्रीमुळे घरातील सदस्य घाबरतील तर प्रेक्षकांचे मात्र चांगलेच मनोरंजन होणार आहे.
View this post on Instagram
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रूसवे फुगवे सुरूच असतात. पण विशाल आणि मीनलचा अबोला मात्र काही संपायचे नाव घेत नाही. टास्कमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर मीनल विशालला म्हणालेली,"कानाखाली मारेन, मला हात नाही घाण करायचे". त्यानंतर मीनल आणि विशालमध्ये अबोला सुरू झाला.
आजच्या भागात मीनल, विशाल, विकास आणि सोनालीमध्ये त्यावरुनच चर्चा होताना दिसणार आहे. सोनाली विशालला म्हणाली,"सुरुवात तरी करा बोलायला". मीनल त्यावर म्हणाली,"मला काही नाही बोलायला". त्यावर विशाल म्हणाला,"तू मीनल शाह आहे. मी विशाल निकम आहे. तुझं मनं खूप मोठं आहे, माझं नाही." या चर्चेदरम्यान मीनलला रडू कोसळले. विकास घरामध्ये एलियन बनला आहे? की आता हा नवा टास्क आहे? मीरा आणि मीनल विकासला बघून का बरं घाबरत असतील? हे प्रेक्षकांना आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या
Bigg Boss 15: 'जर मी अभिनेता नसतो तर...'; बिग बॉसच्या मंचावर करिअरबाबत सलमान खानचा खुलासा
Bigg Boss Marathi 3: वाईल्ड कार्ड स्पर्धक नीथा शेट्टी बिग बॉसच्या घरातून पडली बाहेर
Gangubai Kathiawadi Release Date : Alia Bhatt चा' गंगूबाई काठियावाडी' आता 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha