Bigg Boss 18 : तुझ्या बायकोलाही असाच ॲटीट्यूड दाखवतोस? श्रुतिकाने विवियनला विचारला प्रश्न, करणची मिमीक्री
BB 18 latest Episode Update : बिग बॉस 18 सीझन पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. विवियन डिसेनाचा वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे.
Bigg Boss Season 18 : बिग बॉसच्या सीझन 18 चा धमाकेदार पद्धतीने सुरुवात झाली. 6 ऑक्टोबरला बिग बॉस 18 चा ग्रँड प्रीमियर पार पडला. अगदी पहिल्या दिवसापासूनच यंदाचा सीझन चर्चेत आला आहे. यंदाच्या सीझनमधील 18 सेलिब्रिटी एकापेक्षा एक वरचढ असल्याचं दिसत आहे. अभिनेता विवियन डिसेना याचा वेगळा अवतार पाहायला मिळत आहे.
बिग बॉसच्या घरात विवियन डिसेनाचा वेगळा अवतार
'बिग बॉस 18' मध्ये अँग्री यंग मॅन विवियन डिसेनाचा वेगळा अवतार पाहायला मिळत आहे. विविय हसताना आणि मस्ती करताना दिसत आहे. दरम्यान, त्याला घरातील इतर सदस्यांनी विचारलं की, तो त्याची पत्नी नूरन अलीसमोर ॲटीट्यूड दाखवतोस का आणि कसा वागतोस. करण वीर मेहराने त्याची इतकी नक्कल केली की सगळे हसायला लागले.
तुझ्या बायकोलाही असाच ॲटीट्यूड दाखवतोस?
बिग बॉस 18 च्या प्रोमो व्हिडीओमध्ये विवियन डिसेना बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांना सांगत आहे की, त्याला लहानपणापासूनच खूप ॲटीट्यूड आहे. तो वाक्य पूर्ण करण्याआधीच श्रुतिका अर्जुन त्याला विचारते ती, 'तू तुझ्या पत्नीसोबती असंच ॲटीट्यूडमध्ये बोलतोस का?' यानंतर श्रुतिका विवियनसारखं बोलण्याचा प्रयत्न करत त्याची मीमिक्री करु लागते आणि हे पाहून घरातील इतर सर्व सदस्य हसायला लागतात.
श्रुतिकाने विवियनला विचारला प्रश्न
यानंतर करण वीरने आपल्या कॉमेडीचा तडका लावला. करण वीर घरी विवियनचा आवाज कसा असेल, याची मीमिक्री करुन दाखवायला लागला. यावेळी करण विवियनच्या मागे जातो आणि त्याला फक्त लिप-सिंक करायला सांगतो. करण मागून मुलीचा आवाज काढतो आणि म्हणतो, 'ऐक, तुला काय बनवायचं आहे?' या सर्व प्रकारामुळे घरातील सदस्यांना हसू अनावर होतं.
पाहा बिग बॉस 18 चा नवीन प्रोमो
Mazza ayega in this laughter ride, jab Shrutika aur Karan ke mazedaar sawalo se dikhega Vivian ka funny side! 😂
— JioCinema (@JioCinema) October 10, 2024
Dekhiye #BiggBoss18 @ColorsTV aur #JioCinema par.#BB18 #BiggBoss18onJioCinema #BiggBoss @BeingSalmanKhan pic.twitter.com/f0oOMJy7XP
'बिग बॉस 18' चे स्पर्धक
बिग बॉस 18 मध्ये यावेळी विवियन डिसेना, शिल्पा शिरोडकर, करण वीर मेहरा, शहजादा धामी, हेमा शर्मा, चुम दरंग, ॲलिस कौशिक, अरफीन खान, सारा अरफीन खान, चाहत पांडे, मुस्कान बामणे, नायरा बॅनर्जी, अविनाश मिश्रा, तेजिंदर पाल सिंह बग्गा, रजत हे कलाकार आहेत. दलाल, गुणरत्न सदावर्ते, श्रुतिका अर्जुन आणि ईशा सिंह.
महत्त्वाच्या इतर बातम्या :