VIDEO : रतन टाटांच्या निधनाची बातमी समजताच दिलजीत दोसांझने शो थांबवला, जर्मनीमधील लाईव्ह कॉन्सर्टचा VIDEO व्हायरल
Diljit Dosanjh Tribute to Ratan Tata : जर्मनीमध्ये कॉन्सर्ट सुरु असताना रतन टाटा यांच्या निधनाची बातमी ऐकताच दिलजीत दोसांझने लाइव्ह थांबवून त्यांना श्रद्धांजली वाहिली. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Diljit Dosanjh Tribute to Ratan Tata : पंजाबी अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ याने लाईव्ह शोमध्ये रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. प्रसिद्ध भारतीय उद्योजन रतन टाटा यांचं बुधवारी निधन झालं. ते गेल्या काही काळापासून आजारी होते. त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिलजीत दोसांझचा बुधवारी कॉन्सर्ट सुरु होता. लाइव्ह शोमध्ये दिलजीतला रतन टाटा यांच्या निधनाची बातमी समजली. यावेळी त्याने लाइव्ह कॉन्सर्ट शो थांबवून रतन टाटा यांना मानवंदना दिली.
जर्मनीमध्ये कॉन्सर्ट सुरु असताना रतन टाटा यांच्या निधनाची बातमी
रतन टाटा यांच्या निधनाची बातमी दिलजीत दोसांझला समजताच त्याने तात्काळ त्याचा कॉन्सर्ट थांबवून रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. रतन टाटा यांच्या निधनाची बातमी दिलजीत दोसांझला समजली तेव्हा तो जर्मनीत एका कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत होता. त्याने लगेच लाइव्ह कॉन्सर्ट थांबवून आणि रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या आठवणीत काही ओळी बोलल्या.
दिलजीत दोसांझने लाइव्ह शो थांबवला
दिलजीत दोसांझने कॉन्सर्ट थांबवला आणि सांगितलं की, मला रतन टाटा यांना भेटण्याची संधी मिळाली नाही, पण त्यांच्याकडून खूप काही शिकलो आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये दिलजीत दोसांझ म्हणत आहेत, "सगळे रतन टाटाजींना ओळखतात. त्यांचं निधन झालं. त्यांना माझी श्रद्धांजली".
दिलजीतच्या जर्मनीमधील लाईव्ह कॉन्सर्टचा VIDEO व्हायरल
दिलजीत दोसांझ यावेळी म्हणाला की, "रतन टाटा ज्यांनी आपण सर्व जण ओळखतो, त्यांचं निधन झालं आहे. आपल्याकडून त्यांना छोटीशी श्रद्धांजली. आज त्यांचं नाव घेणे मला खूप गरजेचं वाटलं, कारण त्यांनी आयुष्यात खूप मेहनत केली आहे. त्यांनी आयुष्यात फक्त मेहनत केली, चांगलं काम केलं आणि लोकांची मदत केली. त्यांच्या आयुष्यातून आपल्याला शिकवण मिळते की, चांगला विचार करणं, कुणाच्या तरी कामी येणं आणि आपलं जीवनावर कोणत्याही दाग न लागू देता जगून या जगाचा निरोप घ्यायचा आहे".
पाहा व्हायरल व्हिडीओ
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :