Bigg Boss 16 : 'बिग बॉस'च्या घरात 'गोल्डन बॉईज'ची दमदार एन्ट्री; पाहून घरातील सदस्य म्हणाले...
Bigg Boss 16 : 'गोल्डन बॉईज' म्हणून प्रसिद्ध असलेले सनी नानासाहेब वाघचोरे आणि संजय गुर्जर यांना 'बिग बॉस 16' या रिअॅलिटी शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळाली.
Bigg Boss 16 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो बिग बॉस 16 हा टीआरपीच्या शर्यतीत अव्वल शो पैकी एक आहे. आजकाल हा शो सर्वांचा आवडता झाला आहे. या शो ला अधिक रंजक बनविण्यासाठी, बिग बॉसच्या घरात दोन वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहेत. आणि हे वाईल्ड कार्ड स्पर्धक दुसरे कोणी नसून गोल्डन बॉईज म्हणून प्रसिद्ध असलेले सनी नानासाहेब वाघचौरे आणि संजय गुजर आहेत.
वाईल्ड कार्ड एंट्रीबाबत बऱ्याच दिवसांपासून उत्सुकता होती. मात्र, शोमध्ये 'गोल्डन बॉईज'ची एन्ट्री होईल, अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. दोघांनी शोमध्ये दमदार एन्ट्री केली. गोल्डन बॉईजना पाहून बिग बॉसमध्ये उपस्थित कुटुंबीयांना धक्का बसला. कलर्स टीव्हीने नुकताच त्याचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
गोल्डन बॉईजची दमदार एन्ट्री
बिग बॉसमध्ये आता गोल्डन एन्ट्री होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर बोललं जात असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. यानंतर सोन्याचे दागिने भरलेले सनी आणि संजय बिग बॉसच्या घरात प्रवेश करतात. शोमध्ये दोघेही एमसी स्टेनला भेटतात आणि म्हणतात की तुला खूप एकटे वाटत होते, म्हणून आम्ही आलो. टीना दत्ता आणि सौंदर्या शर्मा त्यांच्या दागिन्यांकडे बघतच राहतात.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
गोल्डन बॉईजना पाहून सदस्य म्हणाले...
अंकित गुप्ताही 'गोल्डन बॉईज'ची खिल्ली उडवताना दिसला. सोन्याच्या गायी कमी आणि सोन्याच्या खाणी जास्त दिसत असल्याचं अंकित स्वयंपाकघरात सांगतो. दुसरीकडे, येत्या एपिसोडमध्ये निमृत कौर अहलुवालियालाही एवढं सोनं पाहून आश्चर्य वाटलं आहे. ती म्हणते मला एक साखळी द्या, माझे आयुष्य सुधारेल. सौंदर्या शर्मा इतकेच सांगते की ती फक्त त्याच्याशीच मैत्री करते. आता बिग बॉसमधील 'गोल्डन बॉईज'चा प्रवास कसा होतो, हे पाहावे लागेल.
महत्वाच्या बातम्या :
Bigg Boss 16 : शालीन भानोटने सुंबूल तौकीरला केले नॉमिनेट; प्रतिउत्तर देत सुंबूल म्हणाली...