Bigg Boss 16 : शालीन भानोटने सुंबूल तौकीरला केले नॉमिनेट; प्रतिउत्तर देत सुंबूल म्हणाली...
Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16' मध्ये नॉमिनेशन वॉर झोन सुरू होणार आहे. यादरम्यान शालीन भानोट सुंबुल तौकीरला टोमणा मारत नॉमिनेट करताना दिसणार आहे.
![Bigg Boss 16 : शालीन भानोटने सुंबूल तौकीरला केले नॉमिनेट; प्रतिउत्तर देत सुंबूल म्हणाली... bigg boss 16 nomination task shalin bhanot nominated sumbul touqeer khan marathi news Bigg Boss 16 : शालीन भानोटने सुंबूल तौकीरला केले नॉमिनेट; प्रतिउत्तर देत सुंबूल म्हणाली...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/28/27e8b59fc824d22d9c9bbc1025788f181669636971435358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bigg Boss 16 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) सध्या शालीन भानोट आणि सुंबूल तौकीर खान (Sumbul Touqeer) यांच्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. सीझनच्या पहिल्या आठवड्यातच सुंबूल आणि शालीनच्या नात्यावर सर्वांनी संशय घेतला होता. वीकेंडच्या वारमध्ये तर सुंबलच्या वडिलांनीदेखील शालीनपासून दूर राहण्याची चेतावनी दिली. मात्र, सुंबूलने शालीनशी मैत्री तोडली नाही. सुंबूल शालीनबाबत खूप पझेसिव्ह झाली आहे यासाठी तिला अनेकदा सुनावले देखील गेले आहे.
होस्ट सलमान खानने वीकेंड का वारमध्ये शालिन भानोटसाठी सुंबुल तौकीरला 'ऑब्सेसिव्ह' म्हटले होते. यावरून नंतर बरेच वाद निर्माण झाले. त्यानंतर सुंबुलच्या वडिलांनी आपल्या मुलीशी फोनवर बोलून ती आजारी असल्याचे सांगितले आणि तिला शालीन आणि टीनापासून दूर राहण्यास सांगितले. यावर शालीन सुंबुलला वारंवार टोमणे मारत आहे. नुकतेच शालीनने सुंबुललाही नॉमिनेट केले आहे.
शालीनने सुंबूलला नॉमिनेट केले
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये नॉमिनेशन टास्क होणार आहे. शालीन भानोटने सुंबुल तौकीर खानला नॉमिनेट केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. याचे कारण सांगताना तो म्हणतो की, तिच्या वडिलांनी सांगितले की मी तुला वाचवेन. यावर सुंबुल याला समर्पक उत्तर देते आणि म्हणते, "तू मला नॉमिनेट करत आहेस की माझ्या वडिलांना?"
View this post on Instagram
शिव ठाकरेसुद्धा नॉमिनेट
अर्चना गौतम (Archana Gautam) यांनी शिव ठाकरेला (Shiv Thakare) नॉमिनेट करते. अर्चना शिवला अनफेअर म्हणत तो फक्त त्याच्या मंडळीचा विचार करतो. आता या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी नेमके कोणते उमेदवार नॉमिनेट झाले आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
Bigg Boss 16 : बिग बॉसच्या घरातून गौतम विगची एक्झिट; घरातून बाहेर येताच 'या' सदस्यावर साधला निशाणा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)