Bigg Boss 15: मी हरावी म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत स्टुडिओतील लोक प्रार्थना करत होते; विजयानंतर तेजस्वी प्रकाशची पहिली प्रतिक्रिया
Tejasswi Prakash After Bigg Boss 15 Win : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने 'बिग बॉस 15' चे विजेतेपद पटकावले आहे.
Tejasswi Prakash After Bigg Boss 15 Win : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने (Tejasswi Prakash)'बिग बॉस 15' चे विजेतेपद पटकावले आहे. तेजस्वीला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळत आहे. अशातच तेजस्वीने तिच्या विजयावर पहिले वक्तव्य केले आहे. तेजस्वी म्हणाली,"स्टुडिओत बसलेले लोक शेवटच्या क्षणापर्यंत मी हरावी म्हणून प्रार्थना करत होते".
तेजस्वीनीने शमिता शेट्टी, प्रतीक सहजपाल आणि करण कुंद्रा सारख्या स्पर्धकांना पराभूत केले आहे. आता जिंकल्यानंतर तेजस्वी म्हणाली, मी हा शो जिंकाला असे कोणालाच वाटत नव्हते. तसेच स्टुडिओत बसलेले लोक शेवटच्या क्षणापर्यंत मी हरावी म्हणून प्रार्थना करत होते.
View this post on Instagram
बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तेजस्वी म्हणाली,"मी बाहेर आल्यानंतर शोमधील माझ्या प्रवासाचा व्हिडीओ पाहिला. तेव्हा मला जाणवले की, अनेक गोष्टी माझ्या विरोधात होत्या. मला खाली खेचण्यासाठी अनेक योजना आखण्यात आल्या होत्या".
'या' मालिकेत तेजस्वीने काम केले आहे
तेजस्वीने '2612' या मालिकेच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. त्यानंतर ती संस्कार धरोहर अपनों की, स्वरांगिनी जोडे रिश्तों के सूर, 'पहरेदार पिया की' व 'सिलसिला बदलते रिश्तों का' अशा टीव्हीवरील मालिकांमध्ये दिसून आली आहे. मालिकांसोबतच तेजस्वी प्रकाशने अनेक रिअॅलिटीशो देखील केले आहेत. 'खतरों के खिलाड़ी 10' व्यतिरिक्त ती 'किचन चॅम्पियन 5', 'कॉमिडी नाइट्स लाइव्ह', 'कॉमिडी नाइट्स विद कपिल' व 'कॉमिडी नाइट्स बचाओ' यांसारख्या शोमध्ये दिसली आहे.