एक्स्प्लोर
बिग बॉस 11 : शिल्पा शिंदे-विकास गुप्ता लग्नाच्या बेडीत अडकणार?
दोघांनी एकमेकांविरुद्ध अनेक आरोप-प्रत्यारोप केले होते. बिग बॉसच्या घरातही त्यांच्यातील भांडण सुरु होतं. पण आता त्यांच्यात मैत्री झाल्याचं समजतं.
मुंबई : बिग बॉसचा अकरावा सीझन सध्या अतिशय चर्चेत आहे. कधी बंदगी आणि पुनीश यांच्या रोमान्समुळे तर कधी हिना खानच्या ड्राम्यामुळे हा सीझन गाजतोय. पण आता सगळ्यात जास्त चर्चा 'भाभीजी घर पर है'मध्ये अंगुरी भाभीची भूमिका साकारलेली शिल्पा शिंदे आणि निर्माता विकास गुप्ता यांची आहे.
खरंतर बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्याआधीच शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता यांच्याच वाद सुरु होता. दोघांनी एकमेकांविरुद्ध अनेक आरोप-प्रत्यारोप केले होते. बिग बॉसच्या घरातही त्यांच्यातील भांडण सुरु होतं. पण आता त्यांच्यात मैत्री झाल्याचं समजतं. इतकंच नाही तर शिल्पा आणि विकास लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे.
टेलीचक्कर या वेबसाईटच्या वृत्तानुसार, दाक्षिणात्य सिनेमातील अभिनेत्री गहना वशिष्ठने हा दावा केला आहे. कलर्स चॅनलशी संबंधित सूत्रांनी ही माहिती दिल्याचं तिने म्हटलं आहे. शिल्पा आणि विकास एकमेकांवर प्रेम करु लागले असून ते डिसेंबरमध्ये बिग बॉसच्या घरातच लग्न करु शकतात.
'भाभीजी घर पर हैं' या मालिकेमुळे शिल्पा शिंदे घराघरात पोहोचली होती. वादामुळे तिला या मालिकेतून हटवण्यात आलं होतं. यावरुनच दोघांमध्ये वाद सुरु होता. परंतु आता कटुता विसरुन दोघे एकत्र आले आहेत. शिवाय लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचंही म्हटलं जात आहे.
या वृत्तानंतर सोशल मीडियावर विकास आणि शिल्पासाठी अनेक नावांनी हॅशटॅग सुरु केले आहेत. काहींनी तर दोघांचं लग्न जुळवण्याचंच निश्चित केलं आहे. चाहत्यांनी त्यांना #shikas हे नावही दिलं आहे.
https://twitter.com/BiggBoss/status/930352170448314368
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement