आईने काय शिकवण दिली माहिती नाही, पण बाप म्हणून माफी मागतो; जानच्या चुकीसाठी कुमार सानूंचा माफीनामा
बिग बॉस रिअॅलिटी शोमध्ये जान कुमार सानू याने मराठी भाषेबद्दल मानहानीकारक वक्तव्य केल्यानं सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जात होता. अशातच या प्रकरणी आता जान सानूचे वडील आणि प्रसिद्ध गायक कुमार सानू यांनी माफी मागितली आहे.
मुंबई : कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या बिग बॉस रिअॅलिटी शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा जानकुमार सानूनं मराठी भाषेबद्दल मानहानीकारक वक्तव्य केल्यानं संताप व्यक्त केला जात होता. या प्रकरणावरुन सर्वच स्तरांतून संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यानंतर कलर्स वाहिनेनी अधिकृतपणे याप्रकरणी माफी मागितली होती. आता जान कुमार सानूचे वडील गायक कुमार सानू यांनीही आपल्या मुलाने केलेल्या व्यक्तव्यावरून माफी मागितली आहे. कुमार सानू यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यामध्ये त्यांना माफी मागितली आहे.
कुमार सानू यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला असून ते म्हणाले आहे की, 'वडिलांच्या नात्याने मी माझ्या मुलाच्या कृत्याबद्दल तुमची केवळ माफी मागू शकतो. मी ऐकलं आहे की, माझा मुलगा जानने असं काहीतरी वक्तव्य केलं, जे गेल्या 41 वर्षांमध्ये माझ्या मनात कधीच आलं नाही. महाराष्ट्र, मुंबई आणि मुंबा देवीने मला आशीर्वाद दिला आणि मला नाव, प्रसिद्धि आणि सर्व काही दिलं. मी मुंबादेवी आणि महाराष्ट्राबाबत अशा गोष्टींचा कधीच विचार करू शकत नाही. माझं भारताच्या सर्वच भाषांवर प्रेम असून मी त्यांचा सन्मान करतो. मी विभिन्न भाषांमध्ये गाणीही गायली आहेत.'
अपने बेटे #JaanKumarSanu द्वारा मराठी भाषा को लेकर दिए गए विवादित बयान पर अब गायक कुमार सानू ने भी अपनी तरफ से माफी मांगी है। कुमार सानू ने बताया कि वो 27 सालों से इन लोगों के साथ नहीं रह रहे और जान कुमार सानू की माँ ने उन्हें किस तरह की शिक्षा दी इस पर भी सवाल उठाए। pic.twitter.com/C2sXKleZyn
— Shivangi Thakur (@thakur_shivangi) October 29, 2020
व्हिडीओमध्ये कुमार सानू म्हणाले की, ते आपल्या कुटुंबापासून 27 वर्ष दूर राहिले आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांनी मुलाचं संगोपन करणाऱ्या त्यांच्या पत्नी रिता यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. एवढंच नाहीतर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या संबंधांचाही उल्लेख केला. हा व्हिडीओ टीव्ही9च्या पत्रकार शिवांगी ठाकूर यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.
जान कुमार सानू यांनेही आपल्या वक्तव्यासंदर्भात माफी मागितली असून यासंदर्भातील व्हिडीओ एका चॅनलनेही प्रसिद्ध केला होताय या व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, जान कुमार सानूचा माफीनामा जो त्यांनी मराठी भाषेसंदर्भातील आक्षेपार्ह्य वक्तव्यासाठी दिला होता. हा व्हिडीओ 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता.
पाहा व्हिडीओ : मराठी भाषेची चीड येणाऱ्या जान कुमार सानूला लवकरच थोबडवणार, मनसेची धमकी
'तुला थोबडवणार'... जान कुमारला मनसेचा इशारा
मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, जान कुमार सानू... मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी... मुंबईतून हाकलून देण्यासाठी याला मी नॉमिनेट करतोय, असं अमेय खोपकर यांनी म्हटलं होतं.
ट्विटमध्ये अमेय खोपकर म्हणतात की, मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवनार लवकरच आता आम्ही मराठी. कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं, असं देखील खोपकर यांनी म्हटलं होतं.
जान सानूवर नेपोटिझमचा आरोप
बिग बॉस 14 मध्ये सतत काही ना काही गोंधळ सुरु असतो. बॉलिवूडमधील नेपोटिझमचा मुद्दा बिग बॉसच्या घरात देखील जाऊन पोहोचला आहे. महाराष्ट्रीयन गायक राहुल वैद्यने एलिमिनेशनमध्ये जान कुमार सानू नॉमिनेट करताना नेपोटिझमचा आरोप केला होता. जान कुमार सानूवर नेपोटिझमचा आरोप केल्यानंतर त्याच्या आईने आरोप फेटाळले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, जानमध्ये प्रतिभा आहे. घरातील लोक तसेच पब्लिक देखील जानला त्याच्या टॅलेंटमुळं प्रेम करत आहेत, असं जानच्या आईनं म्हटलं आहे.
पाहा व्हिडीओ : जान सानूच्या मराठीच्या मुद्द्यावरून शिवसेना-मनसे आक्रमक, 'कलर्स'चा मुख्यमंत्र्यांकडे माफिनामा
बिग बॉसमध्ये जान सानूकडून मराठी भाषेचा अवमान, कलर्स वाहिनीनं मागितली माफी
कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या बिग बॉस रिअॅलिटी शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा जान कुमार सानूनं मराठी भाषेबद्दल मानहानीकारक वक्तव्य केल्यानं संताप व्यक्त केल्यानंतर अखेर कलर्स टीव्हीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून माफी मागितली आहे. मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या जान कुमार सानू ला BIG BOSS मधून हाकला, अन्यथा शो चालू देणार नाही, असा इशारा शिवसेना आणि मनसेने दिला होता.
यानंतर कलर्स वाहिनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माफी मागितली आहे. पत्रात म्हटलं आहे की, कालच्या भागात मराठी भाषेविषयी जो वादग्रस्त भाग प्रसारित झाला तो आम्ही सर्व प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकत आहोत. महाराष्ट्रातील जनतेची माफी मागत वाहिनीने पत्रात म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील प्रेक्षक आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या गेल्यामुळं आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. आम्ही सर्व भाषांचा सन्मान करतो, असं पत्रात म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :