एक्स्प्लोर

'जान कुमार सानूला BIG BOSS मधून हाकला, अन्यथा शो बंद पाडू', शिवसेनेचा इशारा

बिग बॉस रिअॅलिटी शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा जान कुमार सानूनं मराठी भाषेबद्दल मानहानीकारक वक्तव्य केल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या जान कुमार सानू ला BIG BOSS मधून हाकला, अन्यथा शो चालू देणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

मुंबई : कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या बिग बॉस रिअॅलिटी शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा जान कुमार सानूनं मराठी भाषेबद्दल मानहानीकारक वक्तव्य केल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या जान कुमार सानू ला BIG BOSS मधून हाकला, अन्यथा शो चालू देणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. यासंदर्भात शिवसेना आमदार आमदार प्रताप सरनाईकांनी कलर्स वाहिनीला अल्टिमेटम दिलं आहे.  जान कुमार सानूनं मराठी भाषेत बोलू नकोस, हिंदी भाषेत बोल असा अत्यंत चुकीच्या पद्धतीने आरडाओरडा करून मराठी भाषेचा अवमान केला आहे.  मराठी भाषेची याला चीड येते, अशा संदर्भातलं वक्तव्य जान कुमार सानूनं केलं आहे.

त्या बद्दल कलर्स वाहिनीने जर मुजोर जान कुमार सानू याची या मालिकेतून हकालपट्टी केली नाही, तर सेटवर येऊन शिवसेना स्टाईल आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.  सलमान खानने स्पर्धकांना योग्य ती समज द्यावी, असं आवाहन देखील आमदार प्रताप सरनाईकांनी केलं आहे.

बिग बॉसची शूटिंग बंद पाडू - अमेय खोपकर

कलर्स चॅनेल आणि जान सानूने 24 तासाच्या आत जर शो मध्ये माफी मागितली नाही तर बिग बॉसची शूटिंग बंद पाडू असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला आहे.  जान सानूचं थोबाड फोडून आम्ही त्याला धडा निश्चित शिकवू आणि याला भविष्यात इंडस्ट्रीत काम कसं मिळतं हे ही पाहू, असंही खोपकर एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.

'तुला थोबडवणार'...  जान कुमारला मनसेचा इशारा 

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, जान कुमार सानू... मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी... मुंबईतून हाकलून देण्यासाठी याला मी नॉमिनेट करतोय, असं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.

ट्विटमध्ये अमेय खोपकर म्हणतात की, मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवनार लवकरच आता आम्ही मराठी. कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं, असं देखील खोपकर यांनी म्हटलं आहे.

जान सानूवर नेपोटिझमचा आरोप बिग बॉस 14 मध्ये सतत काही ना काही गोंधळ सुरु असतो. बॉलिवूडमधील नेपोटिझमचा मुद्दा बिग बॉसच्या घरात देखील जाऊन पोहोचला आहे. महाराष्ट्रीयन गायक राहुल वैद्यने एलिमिनेशनमध्ये जान कुमार सानू नॉमिनेट करताना नेपोटिझमचा आरोप केला होता. जान कुमार सानूवर नेपोटिझमचा आरोप केल्यानंतर त्याच्या आईने आरोप फेटाळले आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, जानमध्ये प्रतिभा आहे.  घरातील लोक तसेच पब्लिक देखील जानला त्याच्या टॅलेंटमुळं प्रेम करत आहेत, असं जानच्या आईनं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf Emotional Father Death: शूटिंग सुरू असतानाच अशोक सराफ यांच्या वडिलांचं निधन; प्रसिद्ध कॅमेरामनने सांगितला कॅमेऱ्यामागचा प्रसंग
शूटिंग सुरू असतानाच अशोक सराफ यांच्या वडिलांचं निधन; प्रसिद्ध कॅमेरामनने सांगितला कॅमेऱ्यामागचा प्रसंग
Aarti Solanki on Balancing Devi Murti: '...स्वत:च्या घरच्यांना हवेत लटकवा'; गणपती बाप्पांच्या मूर्तीनंतर देवींच्या बॅलेन्सिंग मूर्ती पाहून मराठी अभिनेत्री भडकली, पोस्टवर संताप व्यक्त
'...स्वत:च्या घरच्यांना हवेत लटकवा'; गणपती बाप्पांच्या मूर्तीनंतर देवींच्या बॅलेन्सिंग मूर्ती पाहून मराठी अभिनेत्री भडकली, पोस्टवर संताप व्यक्त
Janhavi Killekar Pune Missing Boy: कॉपी करताना पकडलं, शिक्षकांनी झापलं, घाबरुन विद्यार्थी घरीच गेला नाही, 26 दिवसांपासून बेपत्ता; अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली...
कॉपी करताना पकडलं, शिक्षकांनी झापलं, घाबरुन विद्यार्थी घरीच गेला नाही, 26 दिवसांपासून बेपत्ता; अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली...
Drishyam 3 Marathi Actress: अजय देवगणच्या 'दृश्यम 3'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीचा जलवा; पोलिसाची भूमिका साकारली, शूटिंगचा अनुभव केला शेअर
अजय देवगणच्या 'दृश्यम 3'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीचा जलवा; पोलिसाची भूमिका साकारली, शूटिंगचा अनुभव केला शेअर

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SDCCB Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चुरस; 21 जागांसाठी 236 अर्ज..चार मंत्री, दोन खासदार, दोन आमदारांसह अनेक दिग्गज नेते मैदानात..
सातारा जिल्हा बँकेत शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली भाजपची तयारी; जयकुमार गोरे बाजूला? चर्चांना उधाण
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
अहिल्यानगर DCC बँक निवडणुकीत ट्विस्ट; तिसऱ्या अपत्यावरुन गदारोळ होताच अखेर सभापती राम शिंदेंची माघार
अहिल्यानगर DCC बँक निवडणुकीत ट्विस्ट; तिसऱ्या अपत्यावरुन गदारोळ होताच अखेर सभापती राम शिंदेंची माघार
Gokul Election: वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
Chhatrapati Sambhajinagar Drought: पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
Satara News: लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
Embed widget