एक्स्प्लोर

Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी

ज्योती वाघमारे यांनी राज्यसभेची खासदारकी कशी मिळाली याबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. सध्याच्या काळात महापालिकेची, ग्रामपंचायतीची निवडणूक लढवणंही सर्वसामान्यांसाठी किती अवघड झालं आहे

मुंबई : आम्ही 6 भावंडे, त्यात मी मोठी, आई-वडिल अशिक्षित, लहानपणी आई एका मंगलकार्यालयात कामाला जायची, तर वडिल दलित पँथरचे शाखाध्यक्ष होते, असे म्हणत ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी आपल्या बालपणीच्या आणि संघर्षातील काळाच्या आठवणी सांगितल्या. शिक्षण झाल्यानंतर पत्रकार म्हणून नोकरी करतानाचे अनुभव, सामाजिक, राजकीय चळवळीतील आणि शिवसेना (Shivsena) पक्षातील प्रवेशापासून ते खासदारकीपर्यंतचा प्रवास त्यांनी माझा कट्ट्यावर उलगडला. गेल्याच आठवड्यात महाराष्ट्रातील 7 राज्यसभा खासदारांची बिनविरोध निवड झाली. त्यात, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून सोलापूरच्या (Solapur) ज्योती वाघमारे यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी साध्या नगरसेवकही नसलेल्या ज्योती वाघमारेंना थेट राज्यसभा मिळाल्याने राज्यात या निवडीची चर्चा झाली. त्याच, अनुषंगाने आज माझा कट्टावर बोलताना त्यांनी बालपण, संघर्ष, चळवळ आणि राज्यसभापर्यंतचा प्रवास सांगितला.    

ज्योती वाघमारे यांनी राज्यसभेची खासदारकी कशी मिळाली याबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. सध्याच्या काळात महापालिकेची, ग्रामपंचायतीची निवडणूक लढवणंही सर्वसामान्यांसाठी किती अवघड झालं आहे. मात्र, थेट राज्यसभा, तीही मागितली नसताना मला देण्यात आली. जेव्हा मला सांगितलं आम्ही तुम्हाला राज्यसभेवर पाठवतोय, डोळ्यात पाणी आलं, रडू लागले, काय बोलावं समजत नव्हतं. मी भावनिक झाले, तेव्हा आता रडायचं नाही तर तुम्हाला लढायचंय असे एकनाथ शिंदेंनी म्हटलं, तो प्रसंग ज्योती वाघमारे यांनी एबीपीच्या माझा कट्टामध्ये उलगडला. माझ्या फॉर्ममध्ये सूचक म्हणून पहिली सही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे, ही राज्यसभा खासदारकीपेक्षा जास्त आनंद देणारी गोष्ट माझ्यासाठी आहे. मला आपल्या बहिणीसारखं, लेकीसारखं त्यांनी स्वत: माझ्यासोबत येऊन फॉर्म भरला याचाही आनंद असल्याचं त्यांनी सांगितलं. 

राज्यसभेसाठी कागदपत्रे घेतल्याचं माहिती नव्हतं

राज्यसभेसाठी खासदारकीचा अर्ज भरण्याच्या 4-5 दिवस आधी माझ्याकडून काही कागदपत्रे घेण्यात आली होती. लाडक्या बहिणी योजनेच्या समितीबाबत ही कागदपत्रे मागून घेतल्याचं मला सांगण्यात आलं होतं. त्यामुळे, राज्यसभेसाठी आपल्याकडून कागदं घेतली जात आहेत, हे मला माहिती नव्हतं. कारण, राज्यसभा हे खूप मोठं पद आहे, आणि या पदाची संधी आपल्याला मिळेल असं वाटत नव्हतं, असं सत्य खासदार ज्योती वाघमारे यांनी माझा कट्ट्यावर उलगडलं. राजकारण, समाजकारणाचे यापूर्वीचे अनुभव वेगळे आले आहेत, दुसऱ्या पक्षातलेही आहेत. अनेकदा तुमची पात्रता असून, मागूनही तुम्हाला पद मिळत नाही. मात्र, शिवसेनेत न मागता मला सर्वकाही मिळत गेलं. खासदारकीसाठी ज्यांची नावं चर्चेत होती, त्यांचं प्रत्येकाचं शिवसेनेसाठी योगदान आहे, त्या सर्वांचा मी आदरच करते, असे म्हणत आपल्या राज्यसभा खासदारकीच्या नाव निश्चितीचा अनुभव ज्योती वाघमारे यांनी उलगडला. 

हेही वाचा

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed News: गहिनीनाथ गडावर CM फडणवीसांनी सुरेश धसांचं नाव घेतलं; भाविकांमधून एकज आवाज, धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री करा
गहिनीनाथ गडावर CM फडणवीसांनी सुरेश धसांचं नाव घेतलं; भाविकांमधून एकज आवाज, धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री करा
Maharashtra Live Blog Updates: सुनेत्रा पवार यांचा हर्षवर्धन सपकाळ यांना पुन्हा एकदा फोन, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या संदर्भात चर्चा
Maharashtra Live Blog Updates: सुनेत्रा पवार यांचा हर्षवर्धन सपकाळ यांना पुन्हा एकदा फोन, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या संदर्भात चर्चा
Ashok Kharat Case: नकली साप, वाघ, गर्भवती महिलेवर अत्याचार...युक्तिवादानंतर न्यायाधीशांचा आरोपीला एकच प्रश्न, अशोक खरात म्हणाला...
नकली साप, वाघ, गर्भवती महिलेवर अत्याचार..न्यायाधीशांचा आरोपीला एकच प्रश्न, अशोक खरात म्हणाला...
Congress Baramati Election: शरद पवारांचा मल्लिकार्जुन खरगेंना फोन; भाकरी फिरली, अर्ज माघारी घेण्याचं आश्वासन दिलं, बारामती पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग
शरद पवारांचा मल्लिकार्जुन खरगेंना फोन; भाकरी फिरली, अर्ज माघारी घेण्याचं आश्वासन दिलं, बारामती पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात स्वल्पविराम, पडद्यामागे काय-काय घडलं? Special Report
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात कोण धुरंदर कोण सरेंडर? Special Report
Cockroach Found In Vande Bharat Meal : झुरळ खिचडीत रेल्वे अडचणीत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washington Sundar: गणना भारताच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये, पण पहिल्या आयपीएल फिफ्टीसाठी तब्बल दहा वर्षांची प्रतीक्षा! तब्बल चार टीममध्ये नशीब आजमावल्यानंतर अखेर स्वप्न साकार
गणना भारताच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये, पण पहिल्या आयपीएल फिफ्टीसाठी तब्बल दहा वर्षांची प्रतीक्षा! तब्बल चार टीममध्ये नशीब आजमावल्यानंतर अखेर स्वप्न साकार
Tamilnadu Custodial Deaths: बाप लेकाचा पोलिस कोठडीत मृत्यू, धमक्यांना न घाबरता हेड कॉन्स्टेबल रेवंती यांची साक्ष ठरली टर्निंग पाँईट अन् तब्बल 9 पोलिसांनाच फाशीची शिक्षा! देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना
बाप लेकाचा पोलिस कोठडीत मृत्यू, धमक्यांना न घाबरता हेड कॉन्स्टेबल रेवंती यांची साक्ष ठरली टर्निंग पाँईट अन् तब्बल 9 पोलिसांनाच फाशीची शिक्षा! देशाच्या इतिहासातील अभूतपूर्व घटना
Public Interest Litigations: आता गेला की तो जमाना! जनहित याचिकांची केवळ व्याख्या करण्याची नव्हे, तर त्या पूर्णपणे रद्द करण्याची वेळ आली; केद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
आता गेला की तो जमाना! जनहित याचिकांची केवळ व्याख्या करण्याची नव्हे, तर त्या पूर्णपणे रद्द करण्याची वेळ आली; केद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
Women Reservation Bill: केंद्राकडून महिला आरक्षण सुधारणा मसुद्याला मंजुरी, विधेयक या महिन्यात मंजूर होण्याची शक्यता; 273 जागा महिलांसाठी राखीव, उत्तर प्रदेशात सर्वाधिक खासदार होणार, महाराष्ट्रात किती?
केंद्राकडून महिला आरक्षण सुधारणा मसुद्याला मंजुरी, विधेयक या महिन्यात मंजूर होण्याची शक्यता; 273 जागा महिलांसाठी राखीव, उत्तर प्रदेशात सर्वाधिक खासदार होणार, महाराष्ट्रात किती?
युद्धखोर इस्त्रायलचा पहिल्याच दिवशी युद्धविरामाला सुरुंग, लेबनाॅनमध्ये 10 मिनिटात 254 जणांच्या कत्तली; अमेरिकेनं सुद्धा पलटी मारली; संतप्त इराणनं होर्मुझ मार्ग पुन्हा रोखला, उद्यापासून चर्चा होणार तरी कशी?
युद्धखोर इस्त्रायलचा पहिल्याच दिवशी युद्धविरामाला सुरुंग, लेबनाॅनमध्ये 10 मिनिटात 254 जणांच्या कत्तली; अमेरिकेनं सुद्धा पलटी मारली; संतप्त इराणनं होर्मुझ मार्ग पुन्हा रोखला, उद्यापासून चर्चा होणार तरी कशी?
NCP Sharad Pawar: दोन्ही राष्ट्रवादींच्या विलनीकरणाच्या मुद्द्याला पूर्णविराम? शरदचंद्र पवार पक्ष ॲक्शन मोडमध्ये, बैठका अन् गाठीभेटींना वेग
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलनीकरणाच्या मुद्द्याला पूर्णविराम? शरदचंद्र पवार पक्ष ॲक्शन मोडमध्ये, बैठका अन् गाठीभेटींना वेग
Nashik Crime News: नाशिकच्या नामांकित कंपनीत भयानक कांड, आधी नोकरी द्यायचे मग रिसॉर्टवर नेऊन...; 9 गुन्हे दाखल, नेमकं प्रकरण काय?
नाशिकच्या नामांकित कंपनीत भयानक कांड, आधी नोकरी द्यायचे मग रिसॉर्टवर नेऊन...; 9 गुन्हे दाखल, नेमकं प्रकरण काय?
Chhaya Kadam Shares Post For Gaurav More: 'फिल्टरपाड्याच्या झोपडपट्टीतून...', दिग्गज अभिनेत्रीची 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेसाठी डोळे पाणावणारी पोस्ट
'फिल्टरपाड्याच्या झोपडपट्टीतून...', दिग्गज अभिनेत्रीची 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेसाठी डोळे पाणावणारी पोस्ट
Embed widget