(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bharti Singh : भारती सिंहची जागा घेतली 'या' अभिनेत्रीने, 'हुनरबाज'चं करणार सूत्रसंचालन
Bharti Singh : 'हुनरबाज' या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन भारती सिंह करणार होती. पण आता तिची जागा सुरभी चांदनाने घेतली आहे.
Bharti Singh : कॉमेडी क्वीन भारती सिंहने (Bharti Singh) रविवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. भारतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलगा झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. भारती सिंह प्रेग्नेंसीच्या शेवटच्या दिवसातही काम करत होती. भारती तिला पती हर्ष लिंबाचियासोबत हुनरबाज आणि खतरा खतरा या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करत होती. पण आता भारती सिंहची जागा नागिन अभिनेत्री सुरभी चांदनाने घेतली आहे.
'हुनरबाज: देश की शान' या कार्यक्रमाचे आता हर्ष लिंबाचियासोबत सुरभी चंदना सूत्रसंचालन केले आहे. या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सुरभी मिथुन चक्रवर्तीसोबत स्टेज शेअर करताना दिसत आहे.
View this post on Instagram
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सुरभी चंदनाने पेस्टर रंगाचा ड्रेस घातला आहे. सुरभी आणि हर्ष लिंबाचियाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. सुरभीला या कार्यक्रमात पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या
अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी खुशखबर! 'पुष्पा 2'साठी तीन गाणी तयार
Grammy Awards 2022 : 'लीव्ह द डोर ओपन'ने पटकावला सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार
RRR OTT Release Date : राजामौलींचा 'आरआरआर' सिनेमा 'या' दिवशी होणार ओटीटीवर प्रदर्शित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha