ड्रग्ज पेडलर्सचा NCB च्या पथकावर हल्ला, समीर वानखेडे यांच्यासह एक जण जखमी; तिघे अटकेत
एनसीबीचे तपास अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकावर काल संध्याकाळी मुंबईतील गोरेगावमध्ये ड्रग्ज पेडलर्सनी हल्ला केला. यामध्ये समीर वानखेडे यांच्यासह एक अधिकारी जखमी झाले आहेत.
मुंबई : सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) सतत ड्रग्ज पेडलर्स विरोधात कारवाई करत आहेत. या दरम्यान एनसीबीच्या वतीने ड्रग्ज पेडलर्सना पकडण्यासाठी छापेमारीही करण्यात येत आहे. अशातच मुंबईत एका छापेमारी दरम्यान एनसीबीच्या पथकावर हल्ला करण्यात आला आहे. ज्यामध्ये तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
एनसीबीचे तपास अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकावर काल संध्याकाळी मुंबईतील गोरेगावमध्ये ड्रग्ज पेडलर्सनी हल्ला केला. या प्रकरणात आता कारवाई करण्यात आली असून तीन लोकांना अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात दोन अधिकारी जखमी झाले आहेत. या प्रकरणी पुढिल तपास सुरु आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात जेव्हा बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर अनेक सेलिब्रिटींवर कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई करणारे समीर वानखेडेच होते. समीर वानखेडे हे एनसीबीचे विभागीय संचालक आहेत. बॉलिवूडचं असलेलं ड्रग्ज कनेक्शन हे त्यांच्याच नेतृत्त्वात काम करणाऱ्या पथकाने उघड केलं होतं. आता त्यांच्यासह त्यांच्या पथकावर हल्ला झाला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
पाहा व्हिडीओ : मुंबईत ड्रग तस्कराचा एनसीबीच्या पथकावर हल्ला
दरम्यान, एनसीबीचं पथक कॅरी मेंडिस नावाच्या एका व्यक्तीला पकडण्यासाठी गोरेगाव येथे गेलं होतं. यावेळी एनसीबीच्या पथकासोबत ड्रग्ज पेडलर्सही होते. तेव्हा एनसीबीच्या पथकावर हल्ला करण्यात आला. 50-60 लोकांच्या जमावाने एनसीबीच्या पथकावर हल्ला केला होता. त्यानेळी एनसीबीच्या पथकाला स्थानिक पोलिसांची मदत घ्यावी लागली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
दरम्यान, घटनेच्या वेळी पाच लोकांचं पथक छापेमारीसाठी गेलं होतं. ज्यापैकी दोन एनसीबीचे अधिकारी जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तसेच इतर अधिकारी सुरक्षित आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- Drugs Case | कॉमेडियन भारती आणि हर्षला दिलासा, जामीन मंजूर
- Drugs Case | भारती आणि हर्षची आजची रात्रही तुरुंगातच; जामीन अर्जावरील सुनावणी टळली
- भारती आणि हर्ष लिंबाचियाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
- कधीकाळी दोन वेळच्या भाकरीची भ्रांत असणारी भारती आता कोट्यवधींची मालकीन
- तब्बल 18 तासांच्या चौकशीनंतर भारती सिंह पाठोपाठ पती हर्ष लिंबाचियालाही एनसीबीकडून अटक