एक्स्प्लोर

Drugs Case | कॉमेडियन भारती आणि हर्षला दिलासा, जामीन मंजूर

ड्रग्ज प्रकरणी कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिम्बाचिया यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर दोघांना जामीन मंजूर केला आहे.

मुंबई : कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिम्बाचिया यांना जामीन मंजूर झाला आहे. 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केला. घरात ड्रग्ज सापडल्याप्रकरणी दोघांना एनसीबीने अटक केली होती.

या दोघांकडे सापडलेला गांजा हा कमी प्रमाणात होता. तो वैयक्तिक सेवनासाठी होता. त्याचा व्यावसायिक वापर केला नव्हता, अशा आशयाचं निरीक्षण कालच कोर्टाने नोंदवलं होतं. शिवाय हर्षची एनसीबी कोठडी नाकारत दोघांचीही रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. हा जामीन अर्ज कालच कोर्टापुढे सादर करण्यात आला होता. पण एक दिवसाचा अवधी तपास यंत्रणांना यावर उत्तर देण्यासाठी देण्यात आला होता. परंतु सरकारी वकील काही कारणांमुळे कोर्टात हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे अखेर कोर्टाने या दोघांची १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करुन त्यांना एनसीबीला यापुढील तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.

कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरात गांजा सापडल्यानंतर दोघांनाही प्रथम एनसीबीने ताब्यात घेतलं. चौकशीनंतर भारती सिंह हिला अटक करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ तब्बल 18 तासांच्या चौकशीनंतर हर्ष लिम्बाचिया यालाही अटक करण्यात आली. काल दोघांनाही कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कॉमेडियन भारती आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया या दोघांनाही कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर दोघांनीही जामीनासाठी अर्ज केला होता. आज दोघांच्याही जामीन अर्जावर मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

भारती-हर्षच्या घरातून 86.5 ग्रॅम गांजा जप्त एनसीबीने शुक्रवारी (20 नोव्हेंबर) एका ड्रग तस्कराला पकडलं. त्याने दिलेल्या माहितीनंतर भारती आणि हर्षच्या घरावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात दोघांच्या घरात 86.5 ग्रॅम गांजा सापडला. या जप्तीनंतर दोघांना एनसीबी कार्यालयात आणण्यात आले. मग चौकशीनंतर दोघांनाही अटक करण्यात आली.

भारती आणि हर्ष यांच्याकडून गांजा घेत असल्याची कबुली : सूत्र भारती आणि हर्ष या दोघांचीही स्वतंत्र खोल्यांमध्ये बसून चौकशी केली गेली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती हिची चौकशी केली असता तिने गांजा सेवन केल्याची कबुली दिली. हर्षही एकत्र गांजा सेवन करायचा.

कोण आहे भारती सिंह? भारती सिंह ही स्टॅण्डअप कॉमेडियन आणि अभिनेत्री आहे. सध्या ती 'द कपिल शर्मा शो'मध्ये काम करत आहे. भारतीने 2017 मध्ये लेखक हर्ष लिम्बाचियासोबत लग्न केलं. तिने आपल्या कारकीर्दीची सुरुवात 'इंडियन लाफ्टर चॅलेन्ज'मधून केली होती. यानंतर तिने अनेक कॉमेडी शोमध्ये काम केला. यामध्ये कॉमेडी सर्कस, कॉमेडी सर्कस महासंग्राम, कॉमेडी सर्कस का जादू, कहानी कॉमेडी सर्कस की आणि कॉमेडी नाईट्स बचाओ यांचा समावेश आहे.

दरम्यान, बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनमध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींची नावं समोर आली आहेत. सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्तीपासून याची सुरुवात झाली आणि त्यानंतर दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, अर्जुन रामपाल, त्याची गर्लफ्रेन्ड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स यांच्यासह अनेक नावं समोर आली आणि त्यांची चौकशीही झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget