एक्स्प्लोर

कधीकाळी दोन वेळच्या भाकरीची भ्रांत असणारी भारती आता कोट्यवधींची मालकीन

आज इंडस्ट्रीची अव्वल कॉमेडियन म्हणून यशाच्या शिखरावर पोहोचलेली भारतीसिंग (Bharti Singh) हिचे बालपण गरिबीत गेलं आहे. वडिलांचे निधन झाले तेव्हा भारती अवघ्या 2 वर्षाची होती.

मुंबई : ड्रग्ज प्रकरणामुळे सध्या कॉमेडियन भारती चर्चेत आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) भारतीच्या घरावर छापा टाकला. भारतीच्या घरी एनसीबीला गांजा मिळाल्याचे वृत्त आहे. ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर भारतीला अटक करण्यात आली आहे. आज इंडस्ट्रीत अव्वल कॉमेडियन म्हणून यशाच्या शिखरावर पोहोचलेली भारतीचं बालपण खूप गरिबीत गेलं आहे. वडिलांचे निधन झाले तेव्हा भारती अवघ्या 2 वर्षांची होती.

एका मुलाखतीदरम्यान, तिच्या बालपणाबद्दल बोलताना भारती म्हणाली, "मी मध्यमवर्गीय कुटुंबातील असून आम्ही चार भावंडे आहोत." माझ्या आईचे वयाच्या 17 व्या वर्षी लग्न झालं. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण, वयाच्या 23 व्या वर्षापर्यंत तिच्या पदरात तीन मुलं होती.

कधीकाळी दोन वेळच्या भाकरीची भ्रांत असणारी भारती आता कोट्यवधींची मालकीन

भारतीचं बालपण खूप हालाखीत गेलं आहे. याबद्दल सांगताना भारती एकदा म्हणाली होती, की "माझा मोठा भाऊ आणि बहिणीचा बहुतेक वेळ आमच्यासाठी अन्न आणि डोक्यावर छप्पर शोधण्यावरचं जात होता. बऱ्याचवेळा तर उपाशीपोटीचं झोपावं लागत असे.

ड्रग्ज प्रकरणात कॉमेडियन भारती सिंगला अटक, एनसीबीकडून पती हर्ष याची चौकशी सुरूच

ते म्हणतात ना प्रत्येकाची वेळ येते. 2018 मध्ये आलेल्या 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'च्या चौथ्या सत्राने भारतीचे नशिब पालटले. या शोमध्ये भारतीने 'लल्ली' नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. या पात्राला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आणि इथूनच भारती कॉमेडी क्वीन झाली.

कधीकाळी दोन वेळच्या भाकरीची भ्रांत असणारी भारती आता कोट्यवधींची मालकीन

कधीकाळी उपाशीपोटी झोपणारी भारती वर्षाला 10.93 कोटी रुपये कमावत आहे. 2019 च्या फोर्ब्सच्या यादीमध्ये भारती सर्वाधिक कमाई करणाऱ्या स्टार्समध्ये 82 व्या स्थानावर आहे. सध्या आपण भारतीचे 'इंडियाज बेस्ट डान्सर' आणि 'द कपिल शर्मा शो' सारखे रॉकिंग शो पाहत आहे.

ड्रग्ज प्रकरणात कॉमेडियन भारती सिंगला अटक कॉमेडियन भारती सिंगला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली आहे. त्याचवेळी तिचा नवरा हर्ष याच्याकडेही चौकशी केली जात आहे. यापूर्वी एनसीबीने भारतीसिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरावर छापा टाकला होता. छाप्यात एनसीबीला संशयास्पद पदार्थ (गांजा) सापडला. दुपारी तीन वाजेपासून सुरु असलेल्या चौकशीनंतर भारतीला अटक करण्यात आली आहे.

Drug connection | कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्षला घेऊन NCBची टीम चौकशीसाठी रवाना

महत्त्वाच्या बातम्या

Actress Asha Singh Passes Away: 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
Govinda legal Action: दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय
दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय
Shweta Tiwari MNS Shalini Thackeray: राज ठाकरेंचं नाव घेत श्वेता तिवारी आक्रमक बोलली; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, शालिनी ठाकरे म्हणाल्या...
राज ठाकरेंचं नाव घेत श्वेता तिवारी आक्रमक बोलली; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, शालिनी ठाकरे म्हणाल्या...
Govinda Spotted Outside Hospital: चेहऱ्यावर मास्क अन् चिंता, पापाराझींना केलं इग्नोर; गोविंदा हॉस्पिटलबाहेर झाला स्पॉट, नेमकं झालं काय?
चेहऱ्यावर मास्क अन् चिंता, पापाराझींना केलं इग्नोर; गोविंदा हॉस्पिटलबाहेर झाला स्पॉट, नेमकं झालं काय?

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Amravti hospital fire new born baby death: मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
मोठी बातमी: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु कक्षात भीषण आग, तीन बालकांचा होरपळून मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Embed widget