एक्स्प्लोर
संस्कारी बाबूजींच्या मुलाचा मध्यरात्री धिंगाणा
मुंबई : संस्कारी बाबूजी फेम प्रसिद्ध अभिनेते आलोक नाथ यांच्या मुलाने काल मध्यरात्री असंस्कारी कारनामा केला आहे. मुंबई पोलिसांनी आलोक नाथ यांचा मुलगा शिवांगवर ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह अंतर्गत कारवाई केली आहे.
आलोक नाथ यांचा मुलगा शिवांग रात्री मैत्रिणीच्या बर्थ डे पार्टीतून परतत होता. याचवेळी खार पोलिसांनी त्यांची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, गाडी थांबवण्याऐवजी शिवांगने ती आणखी वेगात पळवली. पण, पोलिसांनी त्याला सांताक्रूझ भागात अडवलं. तिथेही मद्यधुंद शिवांग आणि त्याच्या मित्राने पोलिसांशी हुज्जत घालायला सुरुवात केली.
दरम्यान, पोलिसांनी शिवांगची गाडी जप्त केली असून त्याला 2600 रुपयांचा दंडही ठोठावला आहे. त्याच्यासह सर्व मित्रांना आज वांद्रे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement