Marathi Actor : शो मस्ट गो ऑन... मालिकेच्या शुटिंगदरम्यान अभिनेत्याची प्रकृती खालावली; सेटवरच उपचार सुरू
Ajinkya Raut : अभिनेता अजिंक्य राऊतची प्रकृती खालावली असून सध्या तो सेटवरच उपचार घेत आहे.

Ajinkya Raut : 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' (Abol Preetichi Ajab Kahani) ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेता अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) आणि जान्हवी तांबट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पण या मालिकेच्या शुटिंगदरम्यान अजिंक्यला दुखापत झाली असून तो सेटवरच उपचार घेत आहे.
अजिंक्यला पाठीचा त्रास होत असल्याने त्यावर उपचार करत तो 'शो मस्ट गो ऑन' म्हणत मालिकेचं शूटिंग करत आहे. दररोज मालिकेचे चित्रकरण सुरु असताना अजिंक्यची तब्बेत थोडी खालावली. पण प्रेक्षकांसाठी नवी मालिका घेऊन येण्याच्या उत्सहात तोच ते सगळं विसरलाय.
'अबोल प्रीतीची अजब कहाणी' या मालिकेच्या सेटवरच अजिंक्य डॉक्टरांना बोलावून तिथेच उपचार करत आहे. त्याच्या चाहत्यांना त्याची फार काळजी असून सोशल मीडियावर त्यांनी त्यांचे अजिंक्यावरील प्रेम व्यक्त केले. अजिंक्यची तब्बेत लवकरात लवकर ठीक व्हावी यासाठी ते त्याला सदिच्छा देत आहेत. अजिंक्यनेदेखील त्याच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावरविशेष पोस्ट करून तो कशी स्वतःची काळजी घेतो आहे याबद्दल माहिती दिली आहे.
View this post on Instagram
'अबोल प्रीतीची अजब कहाणी' मालिकेबद्दल जाणून घ्या... (Abol Preetichi Ajab Kahani Serial Update)
'अबोल प्रीतीची अजब कहाणी' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. त्याची झलक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडते आहे. प्रेक्षकांचा लाडका अजिंक्य राऊत या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव राजवीर आहे. त्याच्याबरोबर गुणी अभिनेत्री जान्हवी तांबट हीसुद्धा या मालिकेतून विशिष्ट व्यक्तिरेखा साकारताना पाहायला मिळते आहे. तिच्या व्यक्तिरेखेचं नाव मयूरी असून ती या मालिकेत बॉडीगार्डच्या वेशातसुद्धा पाहता येणार आहे. आता या दोघांची अजब प्रेमकहाणी कशी असेल, हे लवकरच पाहायला मिळेल.
'अबोल प्रीतीची अजब कहाणी' ही मालिका 17 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजिंक्य सध्या मालिकेचं शूटिंग नियमित करत आहे. तसेच तब्बेतीची काळजीदेखील तो घेत आहे. 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' ही मालिका येत्या 17 जुलैपासून सोनी मराठीवर प्रेक्षकांना सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7.30 वाजता पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या
Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' मालिका अंतिम टप्प्यात; इंद्राने मानले प्रेक्षकांचे आभार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
