Mahesh Manjrekar : महेश मांजरेकर गाजवणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', सादर करणार स्कीट
Maharashtrachi Hasya Jatra : महेश मांजरेकर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात स्कीट सादर करणार आहेत.
Maharashtrachi Hasya Jatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasya Jatra) हा कार्यक्रम लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा ठरतो आहे. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यांमध्ये अनेक दिग्गज नामवंतांचा समावेश आहे. अनेक कलाकार हास्यजत्रेच्या मंचावर हजेरी लावत असतात. आता हास्यजत्रेच्या आगामी भागात महेश मांजरेकर स्कीट सादर करताना दिसणार आहेत.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळेच हास्यजत्रेतील स्कीटमध्ये महेश मांजरेकर स्वतः सहभागी झाले. दरम्यान मांजरेकर म्हणाले,"मी न चुकता हास्यजत्रेचे सर्व भाग पाहतो आणि मला हा कार्यक्रम खूप आवडतो;" मांजरेकरांना हास्यजत्रेच्या मंचावर पाहणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
View this post on Instagram
हास्यजत्रेच्या आगामी भागात 'पांघरूण' सिनेमाची टीम सिनेमाच्या प्रमोशनसाठी येणार आहे. महेश मांजरेकरांसह मेधा मांजरेकर, गौरी इंगवले, अमोल बावडेकर ही मंडळीदेखील हास्यजत्रेच्या मंचावर उपस्थित राहणार आहेत. नुकताच 'पांघरूण' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलेला असून सिनेमाचे प्रचंड कौतुक होत आहे.
समीर-विशाखा, प्रसाद-नम्रता, गौरव-वनिता सारख्या हास्यजत्रेतल्या हास्यवीरांनी प्रेक्षकांना आपल्या विनोदांनी नवी उमेद दिली आहे.
संबंधित बातम्या
Jigna Vora : 'स्कॅम 1992' नंतर हंसल मेहता यांची नवी सीरिज; पत्रकार जिग्ना वोरा यांच्या पुस्तकावर आधारित असणार कथानक
Jhund Teaser : 'झुंड'चा टीझर रिलीज; बिग बींच्या लूकनं वेधलं लक्ष
Praveen Kumar Sobti : महाभारतातील 'भिम' प्रवीण कुमार सोबती यांचे निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha