एक्स्प्लोर

गळ्यात कोब्रा घालून व्हिडीओ, श्रुती उल्फतला अटक आणि सुटका

मुंबई : गळ्यात कोब्रा घातलेला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी अभिनेत्री श्रुती उल्फतची जामीनावर सुटका झाली आहे. मुंबईतील बोरीवली कोर्टाकडून 5000 रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर झाला आहे. कोब्रा गळ्यात घालून काढलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री श्रुती उल्फतला आजच अटक करण्यात आली होती. वन विभागाने भारतीय वनजीव संरक्षण कायदा 9, 48, 49 या कलमानुसार कारवाई केली. श्रुती उल्फत, विपिन पुरी यांच्यासह नितिन सोलंकी आणि उत्कर्ष बाली या दोन प्रॉडक्शन मॅनेजरना 22 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. परंतु जामीन मंजूर झाल्याने श्रुतीची सुटका झाली आहे. काही महिन्यांपूर्वी छोट्या पडद्यावर 'नागार्जुन.. एक योद्धा' ही मालिका 'लाईफ ओके' वाहिनीवर गाजली होती. या मालिकेत भूमिका करणाऱ्या अभिनेत्री श्रुती उल्फतने गळ्यात नाग घालून दोन व्हिडिओ 'इन्स्टाग्राम'वर पोस्ट केले होते. हा व्हिडिओ ऑक्टोबर 2016 मध्ये मालिकेच्या प्रमोशनसाठी तयार करण्यात आला होता. श्रुतीने तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. श्रुती उल्फतने अभिनय केलेले राझ, ऐतबार यासारखे चित्रपट गाजले होते. त्याचप्रमाणे चलती का नाम अंताक्षरी हा टीव्ही शो आणि आय लव्ह यू, ससुराल गेंदा फूल, जमाई राजा, नागार्जुन.. एक योद्धा, गुस्ताख दिल यासारख्या मालिकांमध्येही ती झळकली होती. हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी टीका सुरु झाली होती. त्यानंतर श्रुतीसह चार जणांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. वन्य जीव अधिनियमाचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली या चौघांना अटक झाली आहे. यामध्ये मालिकेतील आणखी एका अभिनेत्री आणि प्रोडक्शनमधील दोन व्यवस्थापकांचा समावेश आहे. काही पशुप्रेमींच्या तक्रारीनंतर मुंबई प्रादेशिक विभागाच्या वन अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला, नागाच्या चित्रणाचा व्हिडिओ स्पेशल इफेक्ट्सचा वापर करुन तयार केल्याचा दावा प्रॉडक्शन टीमने केला होता. त्यामध्ये कोणत्याही जिवंत अथवा मृत सापाचा समावेश नसल्याचं प्रॉडक्शन टीमने म्हटलं होतं. त्यानंतर वन विभागाने सोशल मीडियावरील व्हिडिओ डाऊनलोड करुन मुंबईच्या कलिनामधील फॉरेंसिक लॅबला परीक्षणासाठी पाठवला होता. 17 जानेवारी रोजी त्याचा रिपोर्ट मिळाल्यावर त्या व्हिडिओत जिवंत साप वापरल्याचं दिसून आले. त्यानंतर चौघांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. https://twitter.com/singhvirat246/status/829387777846497281 https://twitter.com/singhvirat246/status/829386928696987648

महत्त्वाच्या बातम्या

Actress Maera Mishra Welcome Baby Girl: 'भाग्यलक्ष्मी' फेम अभिनेत्रीच्या घरी आली 'लक्ष्मी'; दिवाळीच्या 4 दिवस आधी दिली गुडन्यूज, चिमुकलीची शेअर पहिली झलक
'भाग्यलक्ष्मी' फेम अभिनेत्रीच्या घरी आली 'लक्ष्मी'; दिवाळीच्या 4 दिवस आधी दिली गुडन्यूज, चिमुकलीची शेअर पहिली झलक
Tarini Fame Actress Ashwini Gorle On Bold Paithani Dress: मराठी अभिनेत्रीनं घातला पैठणीचा बोल्ड ड्रेस, फोटो व्हायरल होताच तुफान ट्रोलिंग; स्वतःची बाजू मांडताना म्हणाली, 'पैठणीचा अपमान...'
मराठी अभिनेत्रीनं घातला पैठणीचा बोल्ड ड्रेस, फोटो व्हायरल होताच तुफान ट्रोलिंग; स्वतःची बाजू मांडताना म्हणाली, 'पैठणीचा अपमान...'
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
Veen Doghantli Hi Tutena Samar Swananadi Pregnant: 'आपल्याला बाळ होणार...', समर-स्वानंदीच्या आयुष्यात गोड पाहुण्याची चाहुल? 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत अनोखं वळण, VIDEO
'आपल्याला बाळ होणार...', समर-स्वानंदीच्या आयुष्यात गोड पाहुण्याची चाहुल? 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत अनोखं वळण, VIDEO

व्हिडीओ

Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Metro Line 3 : पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो, वेळा, तिकीट दर, जाणून घ्या A टू Z माहिती
पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो, वेळा, तिकीट दर, जाणून घ्या A टू Z माहिती
Pune Crime News: तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा; मुलालाही सोबत घेऊन जाते; 8 पानांची चिठ्ठी लिहली अन्..., आयटी इंजिनिअरच्या पत्नीनं मुलासह 18 व्या मजल्यावरून संपवलं जीवन
तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा; मुलालाही सोबत घेऊन जाते; 8 पानांची चिठ्ठी लिहली अन्..., आयटी इंजिनिअरच्या पत्नीनं मुलासह 18 व्या मजल्यावरून संपवलं जीवन
Team India Playing XI Against NZ 5th T20: वैभव सूर्यवंशी, भुवनेश्वर कुमार IN...; संजू सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
वैभव, भुवनेश्वर IN...; सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
Jalna Accident News: जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
Gokul Election: सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
Embed widget