![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Gossip Aani Barach Kahi : कलाकारांची पोलखोल होणार; 'गॉसीप आणि बरंच काही' मालिकेत पाहायला मिळणार कलाकारांची पडद्यामागची धमाल मस्ती!
Gossip Aani Barach Kahi : 'गॉसीप आणि बरंच काही' या मालिकेत कलाकारांची पडद्यामागची धमाल मस्ती प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
![Gossip Aani Barach Kahi : कलाकारांची पोलखोल होणार; 'गॉसीप आणि बरंच काही' मालिकेत पाहायला मिळणार कलाकारांची पडद्यामागची धमाल मस्ती! Actors will be revealed In the marathi Serial Gossip Aani Barach Kahi you will see the fun behind the scenes of the actors Gossip Aani Barach Kahi : कलाकारांची पोलखोल होणार; 'गॉसीप आणि बरंच काही' मालिकेत पाहायला मिळणार कलाकारांची पडद्यामागची धमाल मस्ती!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/19/a2d1a2803c35978e01090cf09888d16c1660907679549254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gossip Aani Barach Kahi : मालिका विश्वात सध्या वेगवेगळे प्रयोग होत आहेत. मायबाप प्रेक्षक पडद्यावरील मालिकांवर तसंच कलाकारांवर प्रेम करतात. मालिकांच्या पडद्यामागचं वातावरणं कसं असेल, हे जाणून घेण्याची उत्सुकताही प्रेक्षकांना लागून राहिलेली असते. येत्या 21 ऑगस्टपासून दर रविवारी 'गॉसीप आणि बरंच काही' (Gossip Aani Barach Kahi) या मालिकेच्या माध्यमातून मालिकेतल्या कलाकारांची पडद्यामागची धमाल, मजा, मस्ती आणि गप्पा हे सारं प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे.
कलाकारांची पडद्यापलीकडली धमाल आता घरबसल्या पाहा
मालिका विश्वात प्रेक्षकांचा विचार करून नवनवे कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा प्रयत्न निर्माते करत आहेत. कलाकारांच्या वा मालिकांच्या पडद्यामागच्या गमतीजमती हल्ली सोशल मिडियावर पाहायला मिळतात. मात्र जो प्रेक्षकवर्ग या सोशल मिडियापासून, मोबाईलपासून दूर आहे त्या प्रेक्षकवर्गाला आता कलाकारांची, मालिकांची पडद्यापलीकडली धमाल दूरदर्शनच्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
'गॉसीप आणि बरंच काही' या कार्यक्रमामध्ये मालिकांच्या सेटवर जाऊन त्या मालिकेतल्या कलाकारांपैकी एक सूत्रसंचालक घेऊन संपूर्ण पडद्यामागची मजामस्ती त्या सूत्रसंचालकाबरोबरच पडद्यावर पाहायला मिळणार आहे. येत्या रविवारी सोनी मराठी वाहिनीवरच्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातलं पडद्यामागचं ‘गॉसीप आणि बरंच काही’ पाहणं रंजक ठरणार आहे.
कलाकारांच्या पडद्यामागच्या गप्पागोष्टी पाहण्यासाठी प्रेक्षक सोनी मराठी वाहिनीवरील 'गॉसीप आणि बरंच काही' हा कार्यक्रम पाहू शकतात. 'गॉसीप आणि बरंच काही' हा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11.30 वा. सोनी मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या
जे घडणार तेच ती बोलणार... ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ नवी गूढ मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
Cuttputlli : खिलाडी कुमारच्या 'कठपुतली'चा टीझर आऊट; डिज्नी प्लस हॉटस्टारवर होणार रिलीज
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)