एक्स्प्लोर
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतला राणादा खरंच बदलणार!
झी मराठीवरील लोकप्रिय 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत हार्दिक जोशी साकारत असलेल्या राणादाची भूमिका संपणार असल्याची चर्चा रंगली आहे.
मुंबई : कुस्तीच्या फडात समोरच्याला अस्मान दाखवणारा रांगडा मल्ल. पिळदार शरीरयष्टी पण स्वभावाने मात्र भोळा सांब. काय आठवतंय का कोणी? होय होय तोच.. 'चालतंय की' म्हणणारा आपला राणा दा!
आयुष्यातल्या प्रत्येक संकटाला निर्भिडपणे सामोरं जाणारा राणादा लय मोठ्या संकटात अडकलाय राव... हे संकट एवढं मोठ्ठंय की त्याला थेट मालिकाच सोडावी लागू शकते.
अहो खरंच सांगतोय. मालिकेतल्या एका सीनचे काही फोटो भलतेच व्हायरल झाले आहेत की ज्यामुळे राणादाच्या एक्झिटच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
आणि तो सीन आहे राणादाच्या खुनाचा. पप्या पाटील राणादाला संपवण्यासाठी जीवघेणा हल्ला करतो, असा सीन नुकताच चित्रित करण्यात आला आहे.
राणादा या हल्ल्यातून सहीसलामत वाचला तर काहीच प्रॉब्लेम नाही पण जर पप्याचा गेम यशस्वी झाला तर मात्र राणाची भूमिका करणाऱ्या हार्दिकला मालिकेला टाटा-बाय बाय करावा लागेल.
हार्दिकने यावर आपल्याला काहीच माहित नाही असं सांगितलं, तर असं काहीच घडणार नसल्याचं चॅनेलचं म्हणणं आहे.
आमच्या तपासात काही गोष्टी हाती लागल्या आहेत. त्या अशा...
क्रमांक 1. राणादा 'गायब' होणार
ज्या सीनचे फोटोज सध्या व्हायरल होत आहेत, त्यात पप्या पाटील खरंच राणाला मारतो आणि मारहाणीत राणा पाण्यात पडतो. हा तोच पॉईंट आहे जिथून मालिका नवं वळणं घेईल. कारण मारहाणीत जखमी झालेला राणा मालिकेतून बाहेर पडेल. पण घाबरु नका कारण त्याची ही एक्झिट केवळ महिन्याभरापुरतीच असणार आहे बरं का. त्यानंतर राणा परत येणार आहे आणि खरंच परत येणार आहे.
क्रमांक 2. राणादाचा लूक बदलणार!
पण महिन्याभरानंतर परत येणारा राणा पहिल्यासारखाच असेल का? तर अजिबात नाही. तो राणा हा आतापेक्षा बराच बारीक असेल. आता हा पैलवान गडी बारीक झाल्यावर कसा दिसेल. तुम्हीच कल्पना करा.
क्रमांक 3. कथानकातही मोठे बदल होणार
जसा राणा बदलेल ना तसं या मालिकेचं कथानकही बदलेल. त्यातला सगळ्यात मोठ्ठा बदल म्हणजे आपल्या वयनीसाहेब लय चांगल्या हुणारायत. म्हणजे नंदिता चक्क पॉझिटिव्ह दिसेल आणि ती करत असलेल्या सगळ्या कुरघोड्या बंद होणार आहेत.
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून राणादाची एक्झिट?
क्रमांक 4. वाड्यालाही चढणार नवा साज!
एवढं सगळं बदलत असताना गायकवाडांचा वाडा तरी कसा सेम राहिल. अहो या वाड्यालासुद्धा नवा साज चढणार आहे आणि त्याचं कामपण सुरु झालंय बरं का.
क्रमांक 5. लेखकाची लंडनवारी पथ्थ्यावर
मालिकेचे लेखक सुबोध खानोलकर लंडनहून परतले आहेत. ते आल्यावरच या सगळ्या घडामोडींना वेग आला आहे.
क्रमांक 6. बदलांबद्दल कमालीची गुप्तता
या सगळ्या बदलांबाबत कामालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. एवढी की या झालेल्या बदलांची स्क्रिप्टही अजून कलाकारांना दिलेली नाही. कदाचित येत्या दोन दिवसात ती कलाकारांच्या हातात येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement