Aai Kuthe kay Karte : नियतीच्या चक्रात अनिरुद्ध अडकणार, आई कुठे काय करतेचा अंतिम भाग; प्रोमोने वेधलं लक्ष
Aai Kuthe kay Karte : आई कुठे काय करते मालिकेचा शेवटचा भाग लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे. नुकताच अंतिम भागाचा प्रोमो शेअर करण्यात आला.
![Aai Kuthe kay Karte : नियतीच्या चक्रात अनिरुद्ध अडकणार, आई कुठे काय करतेचा अंतिम भाग; प्रोमोने वेधलं लक्ष Aai Kuthe kay Karte star Pravah Marathi serial last episode Promo serial will go off air on 30th November Entertainment Television news in marathi Aai Kuthe kay Karte : नियतीच्या चक्रात अनिरुद्ध अडकणार, आई कुठे काय करतेचा अंतिम भाग; प्रोमोने वेधलं लक्ष](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/25/c0407fe8ce6cd20e546100cf51baea6b1732498134037720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aai Kuthe kay Karte : सलग पाच वर्ष प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केल्यानंतर स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. काही दिवसांपूर्वीच मालिका संपणार ही घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर मालिकेच्या अंतिम भागाचं शूटींग झाल्यानंतर मालिकेत सध्या काम करत असलेल्या कलाकारांनी सेटवरील फोटो शेअर केले होते. त्याचप्रमाणे कलाकारांनी सोशल मीडियावरुन त्यांच्या भावना देखील व्यक्त केल्या होत्या. त्यातच आता मालिकेच्या अंतिम भागाचा प्रोमोही समोर आलेला आहे.
येत्या 30 नोव्हेंबर रोजी आई कुठे काय करते मालिकेचा अंतिम भाग प्रसारित करण्यात येणार आहे. या भागाचा प्रोमो सोशल मीडियावर नुकताच शेअर करण्यात आला आहे. मालिकेच्या अंतिम टप्प्यात प्रत्येकाचा शेवट गोड होत असल्याचं पाहायला मिळतंय. अनघा-अभिषेकचं नातं, ईशा-अनिशचं नातं मार्गावर आलं आहे. त्याचप्रमाणे अभिषेक आणि ईशाच्या मनात असलेला आईविषयीचा रागही निवळल्याचं पाहायला मिळत आहे.
मालिकेचा अंतिम भाग प्रसारित
मालिकेच्या अंतिम भागात अरुंधतीने अनिरुद्ध आणि संजनाला घराबाहेर काढते. अरुंधती अनिरुद्धला म्हणते की, तुम्हाला तुमचे आईवडील, तुमची मुलं,तुमची बायको, तुमचं घर,यातलं काहीही सांभाळता आलेलं नाही आणि वाट्याला काय आलं? त्याचप्रमाणे अनिरुद्धला अरुंधती तिचा समृद्धी बंगल्यातला हिस्सा देखील देते. पुढे अरुंधती म्हणते की,आता तुमची जागा इथे नाही,आता तुमची जागा घराबाहेर आहे..आठवतंय..शेवटी नियतीने तुम्हाला तुमची पातळी दाखवलीच...आता यापुढे कोणाची हिंमत होणार नाही हे विचारायची की, ‘आई कुठे काय करते ?’
स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या 2 डिसेंबरपासून निवेदिता सराफ आणि मंगेश कदम यांची 'आईबाबा रिटायर होत आहेत!' ही मालिका सुरु होणार आहे. त्यामुळे आई कुठे काय करते ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)