Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधती परतली; सर्वांसमोर मिठी मारतानाचा आशुतोषचा व्हिडीओ व्हायरल
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' या मालिकेत अरुंधती अखेर परत आली आहे.

Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे ट्वीस्ट येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेतली आई अर्थात अरुंधती मालिकेतून गायब होती. पण मालिकेतील ट्वीस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस न उतरल्याने आता मालिकेत पुन्हा एकदा अरुंधतीची एन्ट्री होणार आहे.
'आई कुठे काय करते' या मालिकेतील अरुंधती परदेशी गेल्याचं दाखवण्यात आलं होतं. पण या मालिकेतील घडामोडींना मालिकाप्रेमी कंटाळलेले होते. त्यामुळे चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अरुंधतीला उर्फ मधुराणीला मालिकेत पुन्हा येण्याची विनंती केली. अखेर आता चाहत्यांच्या विनंतीचा मान ठेवत अरुंधतीने लगेचच भारतात येण्याचा निर्णय घेतला आहे.
View this post on Instagram
अरुंधती आता 'आई कुठे काय करते' या मालिकेत दिसणार असल्याने चाहते आनंदी झाले आहेत. अरुंधतीच्या एन्ट्रीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रेक्षकांसह आशुतोषचा आनंदही गगनात मावेनासा झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये आशुतोष अरुंधतीला सर्वांसमोर मिठी मारताना दिसत आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेत गायनाच्या कार्यक्रमासाठी अरुंधती परदेशी गेली असल्याचं दाखवण्यात आलं होतं. पण आता केळकरांच्या घरी पुन्हा येऊन ती सर्वांना आश्चर्याचा धक्का देणार आहे.
'आई कुठे काय करते'च्या प्रोमोमध्ये काय आहे? (Aai Kuthe Kay Karte Promo Video)
'आई कुठे काय करते' मालिकेच्या प्रोमोमध्ये अनिश आणि सुलेखा ताईंना सर्वात आधी अरुंधती दिसते. त्यानंतर वीणालादेखील ती दिसते. घरातील सर्व मंडळी आश्चर्याने अरुंधतीचं नाव घेतात. दुसरीकडे आशुतोषला वाटतं की सर्वजण त्याची चेष्टा करत आहेत. त्यानंतर तो मागे वळून पाहतो तेव्हा अरुंधती त्याच्यासमोर उभी असते. त्यानंतर त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि तो सर्वांसमोर तिला मिठी मारतो. आशुतोषला पाहून घरातील सर्व मंडळी मात्र त्याला चिडवतात.
'आई कुठे काय करते' या मालिकेची सध्या सर्वत्र चर्चा आहे. मालिकेतील सर्वच पात्रे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.4 रेटिंग मिळाले आहे. मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावी यासाठी निर्माते वेगवेगळे प्रयोग करत आहेत. पण तरीही या मालिकेला पहिला क्रमांक गाठता आलेला नाही.
संबंधित बातम्या
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेत मोठा ट्विस्ट; देशमुखांच्या घरात घुसून चोराचा इशावर जीवघेणा हल्ला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
