एक्स्प्लोर

Aai Kuthe Kay Karte : 'विशाखा काळजी घे...आता दुसऱ्या प्रवासाची सुरुवात'; 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची भावनिक पोस्ट

Aai Kuthe Kay Karte : आई कुठे काय करते ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यातच अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत आलेली आहे.

Aai Kuthe Kay Karte :  स्टार प्रवाह वाहिनीवरील (Star Pravah) आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. जवळपास 5 वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. त्यानंतर आता ही मालिका ऑफ एअर जाणार आहे. मालिकेच्या शेवटच्या भागाचंही शूटींग नुकतच पार पडलं आहे. त्यानंतर मालिकेतील प्रत्येक कलाकार सोशळ मीडियावरुन पोस्ट करत त्यांच्या पात्राविषयी भरभरुन बोलताना दिसत आहे. 

नुकतच यश देशमुख ही भूमिका साकारणारा अभिनेता अभिषेक देशमुख यानेही पोस्ट करत भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर आता मालिकेतील विशाखा हे पात्र साकारणारी अभिनेत्री पूनम चांदोरकर हिनेही पोस्ट करत सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच तिने तिच्या मलिकेच्या टीमचे आभारही मानलेत. 

'विशाखा'ची भावनिक पोस्ट चर्चेत

अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, विशाखा काळजी घे... 5 वर्ष सुरू असलेला हा प्रवास काल पूर्ण झाला .(थांबला नाही म्हणणार.. )इथून पुढे आता दुसऱ्या प्रवासाची सुरुवात...जिची कुठेही शाखा नाही अशी "विशाखा "असं गमतीमध्ये रवी सर, आप्पा बोलायचे..."आई कुठे काय करते " काल शूटिंगचा शेवटचा दिवस ...रात्री गणपती बाप्पा मोरया असे जेव्हा रवी सर बोलले तेव्हा पहिल्यांदा काहीतरी खोलवर जाणवलं .. ही packup ची घाई, हा आवाज , ही वास्तू, script, क्लोज साठी makeup touchup करून रेडी होणं ,कॉस्च्युम , तयारी आणि बरंच ...बरंच काही काळ समृद्धी बंगल्यातमध्ये थांबलं...आणि मग पहिला दिवस ते आजचा दिवस सगळं डोळ्यासमोरून येऊन गेलं...

पुढे तिने म्हटलं की, या मालिकेने , समृद्धीने कलाकार म्हणून माणूस म्हणून खरच खूप समृद्ध केलं..शेवटचं तिथे मस्त टेकवलं आणि वास्तूचा निरोप घेतला..मुग्धा गोडबोले यांच्या लेखणीतून विशाखा तयार झाली आणि मग रवी सर, सुबोध सर ,तुषार विचारे यांच्या मार्गदर्शनाने तिने आकार घेतला..अगदी कुठेही गेलं तरी विशाखा या नावाने सगळे ओळखतात..लॉकडाऊनमध्ये तर डोळे आणि आवाजावरूनही तोंडावर विशाखा आत्या ही हाक आली की समाधानाने भरून पावत होते. 

View this post on Instagram
 
A post shared by Punam Chandorkar (@punamchandorkar_official)

ही बातमी वाचा : 

Amitabh Bachchan : अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटावर अमिताभ बच्चन यांनी सोडलं मौन, म्हणाले, 'वेगळं होण्यासाठी...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
Shirdi : दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 03 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSantosh Deshmukh Beed : संतोष देशमुख हत्येचं प्रकरण, जातीयवादाचं वळण Rajkiya Sholey Special ReportFadnavis Varsha Bungalow : वर्षा बंगला,काळी जादू अन् टोपलीभर लिंबू Rajkiya Sholey Special ReportShivraj Rakshe Maharashtra Kesari : आखाड्यात कुस्ती हरली? राजकीय आखाडा कुणामुळे? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
Shirdi : दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
मुंबईच्या जेलमध्ये भेटले, प्लॅन ठरला, सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक
मुंबईच्या जेलमध्ये भेटले, प्लॅन ठरला, सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, 65 हजार लोकं येणार; जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, 65 हजार लोकं येणार; जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्रात अचानक हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके मतदार आले कुठून? संसदेत राहुल गांधी आक्रमक  
महाराष्ट्रात अचानक हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके मतदार आले कुठून? संसदेत राहुल गांधी आक्रमक  
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
Embed widget